अमरावती36 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
आज राज्यभरात सर्वत्र जिल्ह्यांमध्ये तलाठी भरती परीक्षेवरून गोंधळ उडाला. सकाळी नऊ वाजता पहिला पेपर होणार होता. मात्र त्याआधीच सर्व्हर डाऊन झाल्यानं परिक्षार्थी परिक्षा केंद्रावर खोळंबले. सकाळपासून सर्वर डाऊन असल्याने वेळेवर परीक्षा सुरू न झाल्याने केंद्रावर गोंधळ पाहायला मिळाला. या गोंधळावरून आमदार बच्चू कडू देखील संतप्त झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भट घेऊन त्यांच्याशी या विषयावर चर्चा करणार आहे. जर त्यांनी योग्य व ठोस भूमीका घेतली नाही तर मी सरकारविरोधात जाईल, असा इशाराच त्यांनी दिला.
30 तारखेला भेट घेणार, अन्यथा आंदोलन करू
बच्चू कडू म्हणाले की, 30 तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना परीक्षा गोंधळ संदर्भात भेटणार आहेत. गोंधळ करणाऱ्या कंपनीवर कारवाई झाली पाहिजे. सरकारने जर या बाबतीत मागे-पुढे पाहिलं तर सरकारच्या विरोधात उभं राहू, अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली. 6 महिन्यानंतरच्या सर्व परीक्षा केरळच्या धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घ्या. कोणत्याही परीक्षासाठी विद्यार्थ्यांकडून वर्षाकाठी फक्त 1000 रुपये परीक्षा फी घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. जर सरकारने यावर निर्णय घेतला नाही तर सरकारविरोधात जाऊ अशी भूमीका त्यांनी मांडली.
संभाजी ब्रिगेडकडून देखील यंत्रणेवर ताशेरे
संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते संतोष शिंदे यांनीही या परिक्षेतील गोंधळावर प्रतिक्रिया दिली आहे. सरकारचा नाकार्तेपणा उघड झाला आहे. तलाठी परीक्षेत यंत्रानेकडून सर्व्हर डाऊनचा घोटाळा झाला आहे. राज्यात हजारो विद्यार्थी परीक्षेपासून वंचित आहेत. तरुणांच्या भावनांशी खेळण्याचा हा प्रकार आहे. शेतकऱ्यांच्या पोरांकडून एका तलाठीच्या परीक्षेसाठी एक हजार रुपये वसूल केले गेले. जर परीक्षेत खेळखंडोबा असेल तर याला जबाबदार कोण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावे, असं ते संतोष शिंदे म्हणालेत.
सर्व्हर डाऊनमुळे राज्यातील परीक्षा लांबणीवर
आज राज्यभरात तलाठी भरतीची परिक्षा होत आहे. सकाळी नऊ वाजता पहिला पेपर होता मात्र सर्व्हर डाऊन झाल्यानं विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं. हा पेपर उशीरा झाला. अमरावती जिल्ह्यात सर्व्हर डाऊन असल्यामुळे तलाठी परिक्षेचा दुपारचा पेपरही दीड तास उशिराने सुरू होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा 2 ते 4 या वेळेत होणार आहे. पहिल्या टप्प्यातील 10.30 ते 12.30 दरम्यान परीक्षा झाली.
निवडीचे केंद्र न मिळाल्यान विद्यार्थी संतप्त
निवडीचे केंद्र न मिळाल्याने मिळालेल्या केंद्रावर विद्यार्थी दाखल झाले. अमरावतीत राज्याच्या कानाकोपऱ्यातून हे विद्यार्थी परिक्षा केंद्रावर आले. पण परिक्षेचं वेळापत्रकात बदल झाल्याने विद्यार्थ्यांना प्रचंड मनस्तापाला सामोर जावं लागलं. अमरावती जिल्ह्यात एकूण तीन टप्प्यात 8 केंद्रावर 2004 विद्यार्थी परीक्षा देत आहेत.