तर रविवारपासून साखळी उपोषण: मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या विरोधात संविधान चौकात आंदोलन

तर रविवारपासून साखळी उपोषण: मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या विरोधात संविधान चौकात आंदोलन


  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nagpur
  • Signs Of Conflict Igniting: Warning Movement At Constitution Square Today Against Giving Kunbi Certificates To Marathas And Chain Hunger Strike From Sunday

नागपूर6 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणे हा ओबीसींवर अन्याय होईल. मराठ्यांना आरक्षण द्यायचे झाल्यास आजची 50 टक्क्यांची अट शिथिल करून त्यात 15-16 टक्के वाढ करण्यात यावी. असे केल्यास कोणाची हरकत नाही. मात्र मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये अशी स्पष्ट भूमिका येथे झालेल्या अखिल कुणबी महासंघाच्या बैठकीत घेण्यात आली.

Advertisement

सरकारने दबावात येऊन असा निर्णय घेतल्यास महासंघातर्फे तीव्र आंदोलन केले जाईल असा इशाराही सरकारला देण्यात आला. उद्या शनिवार 9 रोजी दुपारी 3 वाजता संविधान चौकात सरकारला इशारा आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय सचिव शरद वानखेडे यांनी दिली. रविवार 10 रोजी सकाळी 11 वाजतापासून संविधान चौकातच साखळी उपोषण सुरू करण्यात येणार आहे. तर 15 दिवसांनंतर विशाल मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे वानखेडे यांनी सांगितले.

ओबीसी समाजात याबद्दल आधीच अस्वस्थता आहे. वंशावळ किंवा 1965 च्या पूर्वीच्या कागदपत्रांमध्ये मराठा म्हणून नोंद असल्यास मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण देण्यास हरकत नाही. मात्र सरसकट दिल्यास आंदोलन केले जाईल अशी भूमिका मांडण्यात आली.

Advertisement

या बैठकीला आमदार सुनील केदार, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी आमदार दिनानाथ पडोळे, परिणय फुके, भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर पडोळे, शहराध्यक्ष बंटी कुकडे, अशोक धवड, नरेंद्र बर्डे, पुरुषोत्तम शहाने, अशोक यावले, नरेंद्र जिचकार, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, शरद वानखेडे, दुनेश्वर पेठे, राजेश काकडे, गुणेश्वर आरिकर, सुरेश वर्षे आदी उपस्थित होते.Source link

Advertisement