..तर उद्धव ठाकरेंवर आज ही वेळ आली नसती!: दीपाली सय्यद म्हणाल्या – त्यांनी मुख्यमंत्री असतानाच ‘मविआ’तून बाहेर पडायला हवे होते


नागपूर3 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी काम करायला पाहिजे होते. घराच्या बाहेर पडायला पाहिजे होते. ते आधी सगळ्यांना पळवतात आणि मग स्वतः निघतात. तेव्हाच ते बाहेर पडले असते तर आज ही वेळ त्यांच्यावर आली नसती असे वक्तव्य राजकीय नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी येथे माध्यमांशी बोलताना केले.

Advertisement

शिंदे – ठाकरे एकत्र येण्यासाठी माझे प्रयत्न

दीपाली सय्यद म्हणाल्या, पक्षाचे चिन्ह आणि पक्ष हातून गेल्यामुळे ठाकरेंचा थयथयाट सुरू आहे. ते परत मिळवण्यावरून सध्या वाद विवाद सुरू आहे. उद्धव ठाकरे आणि शिंदे यांनी एकत्र यावे म्हणून मी प्रयत्न केले होते. मात्र उद्धव ठाकरे यांनी ही गोष्ट मनावर घेतली नाही. नाहीतर एवढी ताटातूट झाली नसती. त्यांनी एक पाऊल पुढे टाकले असते तर शिवसेना एकत्र असती.

Advertisement

शिवसेनेचा वापर झाला

दीपाली सय्यद म्हणाल्या, शिवसेनेचा वापर सगळीकडे होतो. सगळीकडे राष्ट्रवादीच्या जागा निवडून येतात. दुसऱ्याच्या खांद्यावर उभे राहण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याऐवजी पक्ष वाढीसाठी आधीच प्रयत्न केले असते तर पक्ष कुठल्या कुठे गेला असता. मी खूप प्रयत्न केले. पण आता ही गोष्ट होणार नाही. कारण वेळ निघून गेली आहे.

Advertisement

शिंदे – फडणवीस यांच्यात चांगला संवाद

दीपाली सय्यद म्हणाल्या, एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्यात चांगला संवाद आहे. त्यातून कामे होताना दिसत आहे. मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही म्हणून कामे थांबलेली नाही. आता मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना आपण भेटू शकतो. तसे आधी नव्हते. मी राजकारणात सक्रियच आहे.

Advertisement

महिला महाराष्ट्र केसरीसाठी माझा पाठपुरावा

दीपाली सय्यद म्हणाल्या, मी महिला महाराष्ट्र केसरीसाठी मोठा पाठपुरावा केला आणि काल जीआर निघाला. झाला याचा मला मोठा आनंद आहे. ६५ वर्षानंतर आता महिला महाराष्ट्र केसरी होत आहे. ही कोल्हापूरला व्हायला पाहिजे. कारण कोल्हापूर कुस्तीची पंढरी आहे.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…



Source link

Advertisement