..तर आगामी लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांना विजयी करू: अकोल्यातील ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांचा शब्द

..तर आगामी लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांना विजयी करू: अकोल्यातील ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांचा शब्द


मुंबई11 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

अकोला लोकसभेची जागा शिवसेनेला मिळावी. काही कारणास्तव ही जागा आमच्या पक्षाला मिळाली नाही आणि येथून वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर मैदानात उतरले, तर आ्ही त्यांना मदत करू. त्यांना निवडून आणू. पण कोणत्याही परिस्थितीत भाजपला ही जागा जिंकू देणार नाही, असे आमदार नितीन देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

Advertisement

राज्यातील 2024 पर्यंतच्या सर्व निवडणुका उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत लढणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर सांगितले. मात्र, शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे मनोमिलन कायम राहिले, तर आम्ही एकटे लढण्यास मोकळे आहोत, असेही ते म्हटले होते. यानंतर ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी प्रकाश आंबेडकरांना लोकसभा निवडणुकीत विजयी करू असे म्हटले आहे.

मतदारसंघ कुणाला सुटणार?

Advertisement

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे गटासोबत युती केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेसोबत युती केली असली तरी ते महाविकास आघाडीसोबत नाहीत. वंचित आघाडीमुळे गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जोरदार फटका बसला होता. त्याची पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये यासाठी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी आंबेडकर यांनी काँग्रेससोबत येण्याचे आवाहन केले होते. त्यावर त्यांनी ना फोन, ना कबुतर अशी प्रतिक्रिया दिली होती. तर स्वत: अकोल्यातून निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले. आता मविआत हा मतदारसंघ कुणाला सुटणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भाजपला विजयी होऊ देणार नाही

Advertisement

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अकोला लोकसभा आणि जिल्ह्यातील विधानसभा निहाय आढावा घेतला. यावेळी अनेक विषयावर चर्चा झाली. भाजपला पराभूत करायचे असेल तर ही जागा नक्कीच शिवसेनेला मिळावी असे मत आम्ही मांडले. गेल्या अनेक वर्षांपासून अकोल्यात काँग्रेसचा पराभव होत आहे त्यामुळे ही जागा आपल्याकडे असावी. यावेळी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी आपल्यासोबत आहेच. पण, त्यांनी केवळ लोकसभेपुरते राहू नये. विधानसभेला आपल्यासोबत सोबत राहायला हवे. अकोला लोकसभेची जागा शिवसेनेला मिळावी. जर शिवसेनेला ही जागा मिळणार नसेल आणि येथून वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर लढणार असतील तर आम्ही त्यांनादेखील विजयी करू. कोणत्याही परिस्थितीत भाजपला ही जागा जिंकू देणार नाही, असे नितीन देशमुख यांनी स्पष्टपणे सांगितले.Source link

Advertisement