तरुणाला मारहाण करून व्हिडिओ व्हायरल: अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक; 1.16 कोटींचे अफिम जप्त, वाचा-क्राईमच्या घटना

तरुणाला मारहाण करून व्हिडिओ व्हायरल: अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक; 1.16 कोटींचे अफिम जप्त, वाचा-क्राईमच्या घटना


पुणे5 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

पुणे शहरात कोंढवा भागात अंमली पदार्थाची विक्रीसाठी आलेल्या परराज्यातील तिघांना गुन्हे शाखेच्या अंमली विरोधी पथक १ ने अटक केली आहे. त्यांच्याकडून १ कोटी १६ लाख ७४ हजारांचे ५ किलो ८१६ ग्रॅम अफिम जप्त करण्यात आले आहे.

Advertisement

सुमेर जयरामजी बिष्णोई (वय-५०, गोकुळनगर लेन, कात्रज-कोंढवा रस्ता. मूळ रा. जयराम आनंदनियोकी दानिया, हनुमान नगर तहसील बावडी, जोधपूर, राजस्थान), चावंडसिंग मानसिंग राजपूत, लोकेंद्रसिंह महेंद्रसिंह राजपूत असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

शहरात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तसेच अंमली पदार्थ विरोधी मोहीम राबवण्यात येत आहे. पोलीस अंमलदार पांडुरंग पवार आणि सचिन मळावे यांना पेट्रोलिंग दरम्यान माहिती मिळाली की, गोकुळनगर येथील लेन नंबर १ मधून कात्रज कोंढवा रोडकडे जाणाऱ्या स्नेहदत्त बिल्डिंग जवळ एकजण अफिम हा अंमली पदार्थ विक्री करत आहे. यानंतर छापा टाकून सुमेर बिष्णोईला ताब्यात घेण्यात आले. अधिक तपास केल्यानंतर त्याच्या ताब्यातून ६४ लाख २८ हजार किमतीचा ३ किलो २१४ ग्रॅम अफिम सह मुदेमाल जप्त करण्यात जप्त आला आहे. याप्रकरणी बिष्णोईवर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

तपासा दरम्यान बिष्णोईच्या दोन साथीदारची माहिती मिळाली होती. बिष्णोईने हे अफिम चावंडसिंग राजपूत, लोकेंद्रसिंह राजपूत यांच्याकडून आणला असल्याचे पुढे आले होते. त्यांच्याकडे अफिमचा साठा असल्याचे समजले होते. चावंडसिंग आणि लोकेंद्रसिंह यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ५२ लाख ४ हजार किमतीचा २ किलो ६०२ ग्रॅम अफिम ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलजा जानकर करत आहेत.

ही कामगिरी ही कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलिस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त सुनिल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, साहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, शैलजा जानकर, पोलीस अंमलदार पांडुरंग पवार, सचिन माळवे, सुजित वाडेकर, ज्ञानश्वर घोरपडे, मारुती पारधी, प्रवीण उत्तेकर, विशाल दळवी, राहुल जोशी यांच्या पथकाने केली.

Advertisement

वाहतूक कर्मचार्‍याच्या पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न

पुणे : वाहतूक विभागात चालक असलेल्या अमलदाराच्या पत्नीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना २१ ऑगस्टला कोथरूड परिसरात घडली आहे. किरकोळ वादावादीतून तिने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. शैला चव्हाण असे आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍या महिला अमलदाराचे नाव आहे.

Advertisement

शैला चव्हाण कारागृह विभागात अमलदार असून तिचे पती पुणे वाहतूक विभागात चालक आहेत. पतीने मोटार विभागाकडून प्रशिक्षण घेतल्यानंतर ९ ऑगस्टपासून ते वाहतूक मुख्यालयात कार्यरत झाले होते. वाहतूक नियोजन पोलीस निरीक्षकांच्या वाहनावर संबंधितांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, नवर्‍याला सुटी मिळत नसल्यामुळे दोघांमध्ये वाद झाल्याची चर्चा होती. त्याच रागातून तिने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे बोलले जात होते. दरम्यान, संबंधित अमलदाराने ९ ऑगस्टला वाहतूक मुख्यालयात हजर झाल्यानंतर १८ ला सुटी घेतली होती. त्यानंतरही २० ऑगस्ट (रविवारी )त्याने रजा घेतली होती. त्यामुळे त्याच्या सुटीबाबत कसलीही तक्रार नसल्याचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी सांगितले.

तरुणाला मारहाण करून व्हिडिओ व्हायरल

Advertisement

बदनामी करत असल्याच्या गैरसमजातून तरुणाला अर्धनग्न करून मारहाण केल्याचा प्रकार कात्रज परिसरात घडला. याप्रकरणी राहुल व्यवहारे, शिवंकर कडू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सचिन रघुनाथ घनवट (वय-२८, नर्हे) याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना १४ ऑगस्ट रोजी संध्यकाळी ७ वाजून ४५ मिनिटांनी केली.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी राहुल घनवट हा बदनामी करतो असे म्हणून आरोपींनी त्याला अर्धनग्न करून मारहाण केली. तसेच यापुढे इव्हेन्ट करायचा नाही म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच याचा व्हिडीओ काढून अनेकांना व्हाट्सअप पाठवला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दिघावकर करत आहेत.

AdvertisementSource link

Advertisement