नागपूरएका तासापूर्वी
- कॉपी लिंक
गेल्या पाच दशकांहwन अधिक काळ नागपूर जिल्ह्याच्या राजकारणावर प्रभाव असलेले काँग्रेसी नेते रणजित देशमुख यांचा फायर ब्रॅण्ड वापरून जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा सक्रिय होण्याच प्रयत्न त्यांचे सुपूत्र आशिष देशमुख करीत आहे. या दिशेने एक पाऊल म्हणून येत्या 29 मे रोजी रणजित देशमुख यांच्या वाढदिवसाचा अभिष्टचिंतन सोहळा सावनेर मतदारसंघातील हेटी सुर्ला येथे आयोजित केला आहे.
कार्यकर्त्यांशी संपर्क व प्रशासनावरील पकड यामुळे रणजित देशमुख यांनी नागपूर जिल्ह्याच्या राजकारणात अद्यापही आपला प्रभाव कायम राखला आहे. सावनेरमधून ते तीनदा आमदार राहिलेले आहे. त्यांना मानणारा मोठा वर्ग सावनेरमध्ये आहे. मात्र सध्या सुनील केदार यांचा हा मतदारसंघ आहे. भाजपालाही सावनेरमधून केदारांना पराभूत करू शकेल असा तगडा उमेदवार मिळू शकलेला नाही. २००९ मध्ये आशिष देशमुख यांनी केदारां विरोधात निवडणूक लढवली होती. त्यात फक्त तीन हजार मतांनी ते हरले होते.
काँग्रेसमधून निलंबित झाल्यानंतर आशिष देशमुख यांची भाजपाशी जवळीक वाढली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरी ते नुकतेच सकाळचा नाश्ता करून आले. बावनकुळे सध्या घाऊकमध्ये कारमध्ये भाजपाचे दुपट्टे घेऊन फिरतात…त्यामुळे आशिष देशमुख यांच्या गळ्यात लवकरच भगवा दुपट्टा दिसल्यास नवल नसल्याची चर्चा आहे…
रणजित बाबू यांची राजकीय कारकीर्द संघर्षमय राहिली. मात्र न डगमगता आपल्या मतांसाठी, मागण्यांसाठी ते नेहमी आग्रही राहिले. त्यानुसारच तडजोड न करता कर्तव्य बजावत राहिले. त्यांनी केवळ विकासाचेच राजकारण केले असे नाही तर विदर्भवासींयाच्या न्याय हक्कांसाठी आजही ते कार्यरत आहेत. वडीलांच्या पावलावर पाऊव ठेवत आशिष देशमुख यांचे राजकारण सुरू आहे. पहिल्यांदा ते सावनेर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. नंतर १९९० च्या दशकात ते विदर्भासाठी स्वतंत्र राज्य होण्यासाठीच्या चळवळीत सहभागी झाले होते. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतही ते राहिले.
आशिष देशमुख यांची राजकीय कारकिर्द
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजीत देशमुखांचे मोठे पूत्र आशिष देशमुख यांची राजकीय कारकिर्द कायमच चर्चेत राहली. 2014 च्या निवडणुकीपूर्वी आशिष देशमुख यांनी राजकारणात प्रवेश केला. भाजपने त्यांना काटोलमधून उमेदवारी दिल्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले आपले काका अनिल देशमुख यांचा पराभव करीत निवडून आले होते. काही वर्षातच त्यांना भाजपची विचारसरणी पटली नाही. सातत्याने केंद्र व राज्य शासनावर उघडपणे टीका करणारे आशिष देशमुख यांनी 2018 साली भाजपला रामराम ठोकत काँग्रेसचा हात धरला. 2019 मध्ये ते देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात निवडणूक लढले.