तयारी तिसरी लाट थोपवण्याची: गरजेपेक्षा तीनपट अधिक ऑक्सिजन; सोलापूरकरांचा श्वास गुदमरणार नाही


Advertisement

सोलापूर / चंद्रकांत मिराखोर16 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

काेराेनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत केवळ प्राणवायू नसल्याने अनेकांना प्राण गमवावा लागला हाेता. त्याचा धडा घेत, जिल्हा प्रशासन आणि महापालिकेने शहर, जिल्ह्यात ऑक्सिजन निर्मिती प्लांट कार्यान्वित केले. त्यातून गरजेपेक्षा तीनपट अधिक ऑक्सिनजची निर्मिती हाेत असल्याचे सांगण्यात आले. तिसऱ्या लाटेत कदाचित खाटा कमी पडतील. परंतु ऑक्सिजन नाही, अशी तयारी असल्याचे प्रशासनाने ठामपणे नमूद केले. काेराेना, आेमायक्राॅन संसर्ग वाढला तरी साेलापूकरांचा श्वास यापुढे गुदमरणार नाही, एवढी खात्री प्रशासनाने सध्या दिली.

Advertisement

दुसऱ्या लाटेच्या वेळी ऑक्सिजन व रेमडेसिव्हिरसाठी रुग्णांच्या नातेवाइकांची प्रचंड धावपळ झाली. आरोग्य यंत्रणेनेही हात टेकले हाेते. त्यापासून धडा घेत, दुसरी लाट आेेसरल्यानंतर प्रशासनाने ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे काम युद्धपातळीवर केले. शहरातील राज्य कामगार विमा याेजना रुग्णालय, साखर पेठेतील बाॅइस मॅटर्निटी, शासकीय रुग्णालय, अश्विनी रुग्णालय येथे प्लांट उभे केले. त्यातून दररोज १९० मेट्रिक टन ऑक्सिजन मिळत आहे. संसर्गाचा आलेख उच्च पातळीवर गेल्यानंतर दरराेज ६३ मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज असते.

– हवेतून निर्मित ऑक्सिजनची ठिकाणे : करमाळा, पंढरपूर, माळशिरस, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे ४ तर महापालिकेअंतर्गत राज्य कामगार विमा रुग्णालय आणि बाॅइस हाॅस्पिटल येथे ११.५१ मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती हाेते.
– सिव्हिल सर्जनअंतर्गत अक्कलकोट, बार्शी, करमाळा, पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा, मंद्रूप, माढा येथे युनिट असून, त्यांची क्षमता ६८.४० मे. टनाची आहे. जिल्हा आरोग्य अधिकारीअंतर्गत कोंडी, कंदलगाव, पुरंदावडे युनिट ३४.२० मे. टन निर्मिती.
– हवेतून निर्मित ऑक्सिजन प्लांट महिला हाॅस्पिटल मंगळवेढा, सुश्रुत हाॅस्पिटल, क्रिटिकल केअर सेंटर, नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हाॅस्पिटल बार्शी, सीएनएस, नवनीत हाॅस्पिटल सोलापूर, अश्विनी हाॅस्पिटल कुंभारी आणि रेल्वे हाॅस्पिटल.
– खासगी ऑक्सिजन निर्मिती केंद्रे : चिंचोळी एमआयडीसीतील एलआर इंडस्ट्रीज २२.८० टन, अर्निकेम इंडस्ट्रीज येथे २१.६६ टन, एस. एस. बॅगस टेंभुर्णी १४.८२ आणि रोनक ट्रेडर्स सोलापूर येथे २२.८० मे. टन, विजय एअर सर्व्हिस नियाेजित.

Advertisement

ऑक्सिजन मुबलकच पण, नियम पाळावेत; खबरदारी महत्त्वाची
पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतील अनुभवातून प्रशासनाने ऑक्सिजन मुबलक प्रमाणात देण्याचे नियाेजन केलेले आहे. तिसरी लाट आली तर प्राणवायू कमी पडणारच नाही. ऑक्सिजनचे सर्व प्रकल्प पूर्ण झाले. काही नियाेजित ठेवले. गरजेपेक्षा तीनपट अधिक ऑक्सिजन पुरवू शकू. परंतु नागरिकांनी या संसर्गापासून दूर राहण्यासाठी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. काेराेनाचा नवा व्हेरिएंट आेमायक्राॅनच्या रूपाने आला. त्याला ताेंड देण्याची तयारी प्रशासनाने केली. परंतु नागरिकांची खबरदारी त्यापेक्षा महत्त्वाची आहे.” धनराज पांडे, महापालिका उपायुक्त, आराेग्य विभाग

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement