तब्बल ३.२ कोटींची बोली लागलेला यश दयाल आहे तरी कोण, गुजरातच्या संघाने याला कसा शोधला वाचा…

तब्बल ३.२ कोटींची बोली लागलेला यश दयाल आहे तरी कोण, गुजरातच्या संघाने याला कसा शोधला वाचा...
तब्बल ३.२ कोटींची बोली लागलेला यश दयाल आहे तरी कोण, गुजरातच्या संघाने याला कसा शोधला वाचा...

इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामात आत्तापर्यंत अनेक युवा खेळाडूंनी प्रभावित केले आहे. नुकतेच १४ एप्रिल रोजी गुजरात टायटन्सकडूनही अशाच एका खेळाडूने छाप पाडली आहे. तो खेळाडू आहे यश दयाल. त्याने १४ एप्रिलला राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यातून आयपीएल पदार्पण झाले. त्याने पदार्पणात ३ विकेट्स घेत गुजरातच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. याच यश दयालला आयपीएल लिलावात कोट्यावधींची बोली लागली होती. त्याच्याबद्दल या लेखातून जाणून घेऊ.

यश दयाल हा २४ वर्षीय खेळाडू असून उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. तसेच तो देशांतर्गत क्रिकेट देखील उत्तर प्रदेश संघाकडून खेळतो. त्याला आयपीएल २०२२ लिलावात गुजरात टायटन्स संघाने ३.२ कोटी रुपये मोजत आपल्या संघात सामील करून घेतले. त्यामुळे आता तो आयपीएल २०२२ मध्ये हार्दिक पंड्याच्या नेतृत्त्वाखाली खेळताना दिसत आहे. त्याच्यासाठी आयपीएल लिलावात अनेक संघांमध्ये चूरस पाहायला मिळाली होती. पण अखेर गुजराजने बाजी मारली.

Advertisement

भारतासाठी केली आहे नेट्समध्ये गोलंदाजी

यश दयाल हे नाव जरी अनेकांनी ऐकले नसले तरी भारतीय देशांतर्गत स्पर्धेत त्याचे नाव गाजत असते. नुकतेच भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात अहमदाबाद येथे पार पडलेल्या वनडे मालिकेदरम्यान यश भारताचा नेट गोलंदाज होता. त्यामुळे तो भारतीय संघासह बायोबबलमध्येही होता. त्याच्याकडे १४० प्रती किलोमीटर वेगाने गोलंदाजी करण्याची क्षमता आहे. तसेच डावखरी गोलंदाज असलेल्या यशकडे चेंडूला स्विंग करण्याचीही कला अवगत आहे.

Advertisement

आयपीएल संघांसाठी दिलेली ट्रायल

यशने यापूर्वी काही आयपीएल संघांसाठी ट्रायलही दिली होती. त्याने मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स अशा संघांसाठी यापूर्वी ट्रायल दिली आहे. तसेच त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्येही आपला ठसा उमटवला आहे. त्याने विजय हजारे ट्रॉफी २०२१-२२ स्पर्धेत १४ विकेट्स घेतल्या होत्या. सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये तो पहिल्या ५ जणांमध्ये होता.

Advertisement

त्याने छत्तीसगढ़विरुद्ध २०१८ मध्ये अ दर्जाच्या सामन्यातून वरिष्ठ क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर त्याला २०१८ सालीच गोवा संघाविरुद्ध अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने आत्तापर्यंत १४ प्रथम श्रेणी सामने खेळले असून १५७ धावा केल्या आहेत. तसेच ५० विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर त्याने १४ अ दर्जाचे सामने खेळले असून २३ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने कारकिर्दीत १६ टी२० सामने देखील खेळले आहेत. यात त्याने १८ विकेट्स घेतल्या आहेत.

Advertisement