तपाेवन एक्स्प्रेस उशिरा धावेल: तपाेवन एक्स्प्रेस, नांदेड ते पुणे अन्‎ नरसापूर एक्स्प्रेस आज उशिरा धावेल‎, पंढरपूर-निझामाबाद गाडी पूर्ववत‎


नांदेड2 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

मध्य रेल्वेने ९ मार्च रोजी कळवल्यानुसार १०‎ मार्चला पंढरपूर येथून सुटणारी पंढरपूर ते निझामाबाद‎ (०१४१४) रेल्वे आणि ११ मार्चला निझामाबाद येथून‎ सुटणारी निझामाबाद ते पंढरपूर (०१४१३) रेल्वेगाडी‎ रद्द केली होती. आता या गाड्या पूर्ववत धावतील. १०‎ मार्चला पंढरपूर येथून सुटलेली पंढरपूर ते निझामाबाद‎ (०१४१४) रेल्वे पंढरपूर ते नांदेड अशी धावेल. नांदेड‎ ते निझामाबाददरम्यान रद्द असेल. ११ मार्चला‎ निझामाबाद येथून सुटणारी निझामाबाद ते पंढरपूर‎ (०१४१३) रेल्वे निझामाबाद येथून न सुटता नांदेड‎ येथून सुटेल.‎

Advertisement

सेलू-ढेंगळी पिंपळगाव-मानवत रोडदरम्यान केले जाणार काम‎
प्रतिनिधी | नांदेड‎ सेलू-ढेंगळी पिंपळगाव-मानवत रोडदरम्यान रेल्वे‎ पटरीचे काम करण्यासाठी शनिवारी (११ मार्च) पाच ‎ ‎ तासांचा लाइन ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे‎ काही रेल्वेगाड्या उशिरा धावणार आहेत.‎ मुंबई-नांदेड तपोवन एक्स्प्रेस (१७६१७) दोन तास १५ ‎ ‎ मिनिटे, नांदेड ते पुणे एक्स्प्रेस (१७६३०) ५० मिनिटे, ‎ ‎ काचीगुडा-रोटेगाव एक्स्प्रेस (१७६६१) तीन तास १० ‎ ‎ मिनिटे, नगरसोल-नरसापूर एक्स्प्रेस (१२७८८) एक‎ तास ३० मिनिटे उशिरा धावेल. तसेच शनिवारी (११ ‎ ‎ मार्च) धर्माबाद येथून सकाळी ४ वाजता सुटणारी ‎ ‎ धर्माबाद-मनमाड मराठवाडा एक्स्प्रेस (१७६८८)‎ धर्माबाद येथून एक तास मिनिटे उशिरा सुटेल. तर, ‎ ‎ करमाड-बदनापूर दरम्यान रेल्वे पटरीचे काम‎ करण्यासाठी शनिवारी ३ तासांचा लाइन ब्लॉक घेण्यात‎ आला आहे. यामुळे काचीगुडा-रोटेगाव एक्स्प्रेस‎ (१७६६१) एक तास दहा मिनिटे उशिरा धावेल. तसेच‎ ‎ औरंगाबाद येथून दुपारी ४.१५ वाजता सुटणारी‎ औरंगाबाद-हैदराबाद एक्स्प्रेस (१७६५०) दोन तास‎ पाच मिनिटे उशिरा सुटेल, म्हणजेच औरंगाबाद येथून‎ सायं. ६.२० वाजता सुटेल.‎

Advertisement
बातम्या आणखी आहेत…



Source link

Advertisement