तपास सुरू: ‘त्या’ तरुणाचा दुसऱ्या दिवशीही लागला नाही शोध; हर्सूल तलावाजवळ दुचाकी उभी


Advertisement

औरंगाबाद11 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

‘मी आत्महत्या करत आहे, हे आपले कदाचित शेवटचे बोलणे असेल,’ असे मित्राला कॉलवर सांगून बेपत्ता झालेल्या तरुणाचा शनिवारीही शोध लागला नाही. हर्सूल तलावाजवळ दुचाकी उभी असल्याने दिवसभर पाण्यात खोलवर त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. आता रविवारी शोध घेतला जाईल, असे निरीक्षक अमोल देवकर यांनी सांगितले.

Advertisement

बायजीपुऱ्यात राहणारा कुणाल देहाडे शुक्रवारी दुपारी घराबाहेर पडला. दुपारी एक वाजता मित्राला कॉल करून आत्महत्या करत असल्याचे सांगितले. घाबरलेल्या मित्राने तत्काळ कुणालचे घर गाठून ही माहिती दिली. तोपर्यंत कुणालने दुसरा कॉल करून “मी हर्सूल तलावाजवळ उभा आहे. मी पाण्यात उडी घेत आहे,’ असे सांगितले. त्यानंतर त्याचा संपर्क झाला नाही. कुणालच्या आई-वडिलांनी तलावाकडे धाव घेतली. तोपर्यंत निरीक्षक देवकर कर्मचाऱ्यांसह पोहोचले. संध्याकाळी सात वाजेपर्यंत शोधले. शनिवारी पुन्हा सकाळी सात वाजता शोधमोहीम सुरू करण्यात आली. मात्र, संध्याकाळपर्यंत त्याचा शोध लागला नाही.

चार वाजता सुरू होता मोबाइल : कुणालच्या मित्राने अनेकदा त्याला कॉल करण्याचा प्रयत्न केला. हर्सूल तलावाजवळील वीटभट्टीजवळ त्याची दुचाकी व एक चप्पल सापडली. चार वाजता मित्राने पुन्हा कॉल केला. तेव्हा मोबाइल सुरू होता. परंतु तो सापडला नाही. त्यामुळे पोलिसांसमोर मोठा संभ्रम निर्माण झाला. तरीही आम्ही कसोशीने तपास करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement