नाशिक24 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
लोकमान्य हॉस्पिटलतर्फे गुडघेदुखी आणि सांधेदुखी रुग्णांसाठी सुपर स्पेशालिटी अस्थिरोग तपासणीचे आयोजन करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सांधेरोपणतज्ज्ञ डॉ. नरेंद्र वैद्य हे शनिवारी (दि. २८) सकाळी ९ वाजता नाशिकमधील महामार्ग बसस्थानकासमाेरील मेडिनोव्हा शताब्दी हॉस्पिटल येथे गुडघेदुखी, खुबा, संधिवात तसेच हाडांच्या त्रासाने पिडीत रुग्णांची तपासणी करणार आहेत. डॉ. नरेंद्र वैद्य हे पुण्यातील लोकमान्य हॉस्पिटल या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक आहेत.
विविध गावात सुपर स्पेशालिटी ओपीडी आयोजित करून रुग्णांना गुडघेदुखी विषयी मार्गदर्शन, अत्याधुनिक उपचाराची माहिती व तपासणी केली जात आहे. रुग्णांनी तपासणीसाठी येताना आपले पूर्वीचे रिपोर्ट, एक्स-रे आणि अन्य काही रिपोर्ट आपल्या सोबत आणणे आवश्यक आहे. डॉ. नरेंद्र वैद्य हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गुडघेरोपण आणि मणक्याचे तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. जगातील दहा देशात त्यांनी अवघड शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत. ४५ हजारहून अधिक गुडघेरोपण शस्त्रक्रिया १२ हजार रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर करून आणि दीड लाखाहून अन्य अस्थिरोग शस्त्रक्रिया त्यांनी केल्या आहेत. रोबोच्या सहाय्याने सांधेरोपण हे तंत्रज्ञान भारतात प्रथम आणून त्यांनी १२ हजारापेक्षा अधिक शस्त्रक्रिया यशस्वी केल्या आहेत.