तत्काळ स्थलांतरित: नेत्र रुग्णालय लवकरच घाटीत स्थलांतरित होणार


औरंगाबादएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

आमखास येथील नेत्र रुग्णालय चिकलठाणा येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, वृद्ध रुग्णांसाठी हा निर्णय गैरसोयीचा असल्याने खासदार इम्तियाज जलील यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून त्यास स्थगिती घेतली आहे. परिणामी आता नेत्र रुग्णालय घाटीतच होणार असल्याची माहिती आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांनी ६ जानेवारी रोजी आमखास मैदान येथील नेत्र विभाग जिल्हा रुग्णालयाच्या चिकलठाणा इमारतीमध्ये तत्काळ स्थलांतरित करण्याचे आदेश दिले होते. त्यांना संयुक्त बैठकीत स्थगिती देण्यात आली.

Advertisement

घाटी रुग्णालयाशी संलग्न आमखास येथील नेत्र रुग्णालय चिकलठाणा येथे हलवण्यास नागरिकांमधून विरोध झाला होता. हा निर्णय मागे घेण्यासाठी ७ जानेवारीस आरोग्य सेवा तथा अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त, आरोग्य सेवा सहसंचालक यांच्याकडे मागणी करण्यात आली होती. आमखास येथील नेत्र रुग्णालयाच्या जागेवर कर्करोग रुग्णांच्या उपचाराकरिता शासनस्तरावरून यापूर्वी नवीन प्रकल्पास मंजुरी मिळाल्याने नेत्र रुग्णालय स्थलांतरित करणे गरजेचे होते. त्या दृष्टीने जिल्हा शल्यचिकित्सकांनी हा निर्णय घेतला होता. मात्र, आता हे रुग्णालय घाटीतच हलवण्याचा निर्णय घेतला. बैठकीत जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय, घाटी अधिष्ठाता डॉ.संजय राठोड, कॅन्सर रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अरविंद गायकवाड, जिल्हा शल्यचिकित्सक दयानंद मोतीपावले उपस्थित होते.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement