तणाव: उपचारासाठी आलेल्या तरुणाचे विषप्राशन; बसस्थानकात मृत्यू


छत्रपती संभाजीनगरएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

मानसिक तणावावर उपचार करण्यासाठी वडिलांसोबत शहरात आलेल्या तरुणाने लघुशंकेला जाण्याचा बहाणा करून विषारी औषध पिले. यात त्याचा बसस्थानकावरच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी समोर आली. पवन विष्णू तिलक (२१, रा. सिंदखेड, जि. बुलडाणा) असे मृताचे नाव आहे. एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गौतम पातारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पवन मानसिक तणावाखाली होता. मानसोपचारतज्ज्ञांकडे उपचार करण्यासाठी वडील त्याला शहरात घेऊन आले होते. परंतु काही कारणास्तव ते उपचार घेऊ शकले नाहीत. त्यानंतर घरी जाण्यासाठी ते सिडको बसस्थानकावर गेले. मात्र, पवन तेथून बेपत्ता झाला. घाबरलेल्या वडिलांनी त्याचा शोध सुरू केला. शनिवारी दुपारी बसस्थानकामध्ये निर्मनुष्य ठिकाणी काहींना तरुण बेशुद्धावस्थेत आढळला. पोलिसांनी धाव घेतल्यानंतर त्याची ओळख पटली. पोलिसांनी त्याला घाटीत दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…



Source link

Advertisement