ड्रोनद्वारे मालमत्तांची पडताळणी​: जळगाव जिल्ह्यातील 98.70 टक्के प्रॉपर्टी कार्ड झाले ऑनलाईन, साडेचार हजार कार्ड होणार रद्द


जळगावएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

शासनाच्या स्वामीत्व योजनेंतर्गत जिल्हा भूमि अभिलेख कार्यालयाकडून ९८.७० टक्के प्रॉपर्टी कार्ड (३ लाख ६६ हजार ८१) ऑनलाईन करण्यात आले आहेत. द्विरुक्ती, दोन नोंदी व इतर त्रुटींमुळे साडेचार हजारावर कार्ड रद्द करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.

Advertisement

जिल्ह्यातील २९९ गावांचे ड्रोनव्दारे सर्व्हेक्षण करुन गावांचे नकाशे व मालमत्तेची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात आली. २६८ गावांचा यापूर्वी पारंपारिक पध्दतीने सिटी सर्व्हे करण्यात आलेला होता. १ हजार १८० गावांमध्ये मिळकतीचे नकाशेच नव्हते. ड्रोन सर्व्हेक्षणानुसार गावठाणातील मालमत्तांचे जीआयएस आधारित रेखांकन व मूल्यांकन करण्यात आले. गावठाणातील प्रत्येक घराचा, खुल्या जागेचा, रस्त्यांचा नकाशा तयार करण्यात आलेला आहे. प्रत्येक घर, गल्ली, खुली जागा, रस्त्यांना नगरभूमापक क्रमांक देण्यात आलेला आहे. प्रत्येक मिळकतींची महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील तरतुदीनुसार प्रॉपर्टी कार्ड तयार करण्यात आले आहेत.

केवळ १३५ रुपयांत मिळेल प्रॉपर्टी कार्ड

Advertisement

भूमी अभिलेख विभागातून प्रॉपर्टी कार्ड काढण्यासाठी त्या प्रॉपर्टी कार्डवर असलेल्या इतर मिळकतधारकांच्या नोंदीनुसार शुल्क द्यावे लागत होते. प्रॉपर्टी कार्ड गहाळ होण्याचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे नागरिकांना भूमी अभिलेख कार्यालयात वारंवार चकरा माराव्या लागत होत्या. नागरिकांना कर्मचाऱ्यांकडून पैशांची मागणी करण्यात येत होती. आमदार सुरेश भोळे यांनी या विभागात जावून अधिकाऱ्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. कारवाईची मागणी केली होती. प्रॉपर्टी कार्डवर नोंदी जास्त असल्यास ५ ते ८ हजार रुपये एवढे शुल्क नागरिकांना द्यावे लागत होते. आता प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन झालेले आहेत. ऑनलाईन कार्ड काढण्यासाठी ग्रामीण क्षेत्र ४५ रुपये, नगरपालिका हद्दीत ९० तर मनपा हद्दीत केवळ १३५ रुपये ऑनलाईन शुल्क भरुन प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहेत.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement