पुणेएका तासापूर्वी
- कॉपी लिंक
तंत्रज्ञान, विश्वास, प्रतिभा या त्रिसूत्रीचा वापर करून आपल्या अंगी व्यावसायिक कुशलता वृद्धिगत होण्यासाठी उपयोग करण्याचे आवाहन पदमविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केले. 18 वा महाराष्ट्र राज्य पोलिस कर्तव्य मेळाव्याचे उद्घाटन मंगळवारी राज्य राखीव पोलिस दल गट क्र. 2 पुणे येथील परेड मैदानावर डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
स्पर्धेत सहभागी 24 संघांनी शिस्तबद्ध संचलन करुन प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली. गतवर्षीच्या 66 वा अखिल भारतीय पोलिस कर्तव्य मेळाव्यामध्ये पदक विजेत्या पोलिस अधिकारी व कर्मचारी यांचा डॉ. माशेलकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रशांत बुरडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुण्यांचे हस्ते गतवर्षीच्या 66 वा अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यामध्ये पदक विजेत्या पोलिस अधिकारी व कर्मचारी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांनी स्पर्धकांना व उपस्थितांना टेक्नॉलॉजी, ट्रस्ट, टॅलेंट या त्रिसुत्रींचा आपल्या अंगी व्यावसायिक कुशलता, वृद्धींगत होण्यासाठी उपयोग करण्याचे आवाहान केले. तसेच स्पर्धकांना निकोप व खेळीमेळीच्या वातावरणात स्पर्धा पार पाडण्याविषयी मार्गदर्शन करून आगामी अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्याकरिता शुभेच्छा दिल्या. 66 व्या अखिल भारतीय कर्तव्य मेळाव्यामध्ये सुवर्ण पदक प्राप्त करणान्या श्रीकृष्ण गोविंद गवस, पोलिस उप निरीक्षक, राज्य राखीव पोलीस बल यांना उद्घाटन ज्योत आणण्याचा मान देण्यात आला व त्यांनी स्पर्धकांना शपथ दिली.
सदर कार्यक्रमास प्रशांत बुरडे, अपर पोलीस महासंचालक सीआयडी, सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, डॉ. दिलीप पाटील-भुजबळ, विशेष पोलीस महानिरीक्षक, सीआयडी, संजय येनपुरे, विशेष पोलीस महानिरीक्षक, सीआयडी, अशोक मोराळे, विशेष पोलीस महानिरीक्षक, एस. आर.पी.एफ. पुणे, रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त, पूर्व विभाग, पुणे शहर, नामदेव चव्हाण, पोलीस उप महानिरीक्षक, सारंग आवाड, पोलीस उपमहानिरीक्षक, प्रशासन, पंकज देशमुख, पोलीस अधिक्षक, , नम्रता पाटील, समादेशक, एस. आर.पी.एफ., गट क्र.2, दिनेश बारी, पोलीस अधिक्षक, मनिषा दुबुले, पोलीस अधिक्षक, पल्लवी बर्गे, पौर्णिमा तावरे, अपर पोलीस अधिक्षक, एम. आय. ए., पुणे तसेच गुन्हे अन्वेषण विभाग, राज्य राखीव पोलीस दल व एम.आय.ओ. येथील इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.