डॉक्टरची आपल्याच दवाखान्यात आत्महत्या: कुटुंबाच्या अपेक्षा पूर्ण करु शकत नाही…; कोल्हापूरच्या कागल तालुक्यातील घटना


कोल्हापूर38 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

कुटुंबाच्या अपेक्षा पूर्ण करु शकत नाही, मी चांगला मुलगा आणि बाप होऊ शकत नाही, असे म्हणत कोल्हापुरात एका तरुण डॉक्टरने आपल्याच रुग्णालयात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. यामुळे कागल तालुक्यातील मुरगूडमध्ये खळबळ उडाली आहे. महेश रामचंद्र तेलवेकर (वय 40 वर्षे) असे मृत डॉक्टरचे नाव आहे.

Advertisement

सुसाईड नोटमध्ये काय?

महेश तेलवेकर यांनी लिहलेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, ​​​​मी कुटुंबाच्या अपेक्षा पूर्ण करु शकत नाही, मी चांगला मुलगा होऊ शकलो नाही, मी चांगला बाप होऊ शकलो नाही. माझ्या आत्महत्येस कुणाला जबाबदार धरू नये, असे लिहले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तर काही कंपन्यांमध्ये पैसे गुंतवल्याचाही सुसाईड नोटमध्ये उल्लेख आहे.

Advertisement

कुुटुंब मुळ चिखलीचे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महेश तेलवेकर यांचे कुटुंब हे मूळचे नाणीबाई चिखली (ता. कागल) या गावचे आहेत. त्यांनी कागलमध्ये काही काळ आपला दावाखाना चालवला तर त्यानंतर मुरगुडमध्ये बाजारपेठेत ‘ओम क्लिनिक’ नावाने दवाखाना सुरु केला होता.

Advertisement

आर्थिक विवंचनेतून उचलेले पाऊल?

महेश तेलवेकर हे गेले काही दिवस आर्थिक विवंचनेत असल्याची माहिती समोर आली आहे. यातूनच त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे. रविवारी 12 मार्च रोजी दुपारी दावाखाना असलेल्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर जात त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले. या प्रकरणी शिवाजी कुंभार यांनी मुरगूड पोलिसात फिर्याद दिली.

Advertisement

कोल्हापुरात आत्महत्येचे सत्र थांबेना

कोल्हापुरात गेल्या काही दिवसात अनेक जणांनी आत्महत्या केल्या आहेत. यात 20 ते 30 वयोगटातील तरुणांचा आकडा मोठा असल्याने पोलिसांकडून आत्महत्या करु नये यासाठी प्रबोधन सुरू करण्यात आले आहे. यातच जानेवारी महिन्यात कोल्हापुरात जवळपास 75 जणांनी आत्महत्या केल्या.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement