औरंगाबाद31 मिनिटांपूर्वी
Advertisement
- कॉपी लिंक
डाॅक्टर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत दुसऱ्या दिवशी ठाणे सुपर्ब, केईम, मेळघाट टायगर्स, फिट मॉर्फ पुणे, एससीबी नाशिक, दिल्ली चॅम्पियन, नाशिक लेजंट संघांनी विजयी आगेकूच केली. शुक्रवारी झालेल्या लढतीत केईएम मार्ड अॅथलिट संघाने औरंगाबाद इंडियन्स संघावर ३ गडी राखून मात केली. यात दीपक मुंडे सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
Advertisement
इतर लढतीत ठाणे सुपर्बने आयकॉन हाॅस्पिटल संघावर ७३ धावांनी, मेळघाट टायगर्सने इन्स्पायर केअर संघावर ७ गडी राखून, पुणे संघाने आयएमए युनिटी संघावर १० गड्यांनी, एससीबी नाशिकने केरळा जॉर्गसवर ८ गड्यांनी मात केली.नाशिक लेजंटने मराठवाडा रॉयल परळीला ९ गड्यांनी पराभूत केले. दिल्ली चॅम्पियनने कोल्हापूरवर ५४ धावांनी विजय मिळवला.
Advertisement
बातम्या आणखी आहेत…
Advertisement