डाॅक्टर, परिचारिकांअभावी आशा वर्कर, मातेकडूनच प्रसूती: अंजनेरी प्राथमिक आराेग्य केंद्रातील प्रकार उघड


नाशिकएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक
  • महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर अंजनेरी प्राथमिक आराेग्य केंद्रातील प्रकार उघड

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सर्वत्र उपक्रमांचा धडाका सुरू असताना त्र्यंबक तालुक्यातील अंजनेरी प्राथमिक आराेेग्य केंद्रात प्रसूतीसाठी आलेल्या महिलेवर वेगळाच प्रसंग उद्भवला. डॉक्टर व परिचारिकेअभावी आशा वर्कर्स व महिला रुग्णाच्या मातेलाच मुलीची प्रसूती करावी लागली. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बर्डेच्या वाडीतील गरोदर महिलेला रविवारी (दि.५) प्रसूती वेदना हाेऊ लागल्याने साेनाबाई लचके यांनी आशा कार्यकर्ती शीला देहाडे यांच्याशी संपर्क साधत खासगी वाहनातून अंजनेरी प्राथमिक आराेग्य केंद्रात गरोदर मुलीला आणले. मात्र, तेथे आराेग्य केंद्र बंद असल्याचे आढळले. धावपळीनंतर वर्ग ४ च्या कर्मचाऱ्याने रुग्णालय उघडले. मात्र, प्रसूती करण्यासाठी डॉक्टर व परिचारिका उपस्थित नसल्याने काळजी वाढली. गराेदर महिलेची आई साेनाबाई लचके यांनी स्वत:च आशा कार्यकर्तीच्या मदतीने माेठी जोखीम उचलून मुलीची प्रसूती केली. सुदैवाने यात त्यांना यश आल्याने मातेने बाळाला जन्म दिला. या प्रकारानंतर मात्र आदिवासी बांधवांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

Advertisement

महिलादिनी करणार आंदाेलन
या घटनेमुळे आराेग्य केंद्रांचा भोंगळ कारभार समाेर आला आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने संबंधित डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर कारवाई न केल्यास महिला दिनाला आम्ही आंदाेलन छेडू. -भगवान मधे, अध्यक्ष, एल्गार कष्टकरी संघटना, नाशिक जिल्हा

चाैकशीसाठी त्रिसदस्यीय समिती
अंजनेरी येथे घडलेली घटना ही अयाेग्य अशीच आहे. आराेग्य केंद्राचे प्रथमवर्ग अधिकारी प्रशिक्षणानिमित्त बाहेर हाेते. मात्र, दुसरे डॉक्टर व परिचारिका का नव्हते? याबाबतची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. -डाॅ. हर्षल नेहते, जिल्हा आराेग्य अधिकारी, जि.प.
अंजनेरी आराेग्य केंद्रात बाळ, माता व वयाेवृद्ध आई.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…



Source link

Advertisement