नाशिक27 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
नाशिक पदवीधर मतदार संघासाठी आज माघार घेण्यासाठी शेवटचा दिवस असल्याने दुपारी तीन वाजेपर्यंत चित्र स्पष्ट समोर येणार आहे. परंतु निवडणुकीतील प्रबळ दावेदार सत्यजित तांबे यांच्या वडिलांच्या नावाशी साधर्म्य असलेले पनवेल येथील डॉ. सुधीर सुरेश तांबे यांनी आज माघार घेतली आहे.
अर्ज छाननी मध्ये 22 इच्छुकांचे अर्ज हे वैध ठरले असून अंतिम उमेदवार हे आज दुपारी तीन वाजेनंतर जाहीर होणार आहे. सोमवारी दुपारी बारा वाजेपर्यंत दोन इच्छुकांनी माघार घेतली असून त्यामध्ये डॉ. सुधीर सुरेश तांबे आणि अमोल खाडे यांनी निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे आत्तापर्यंत 20 इच्छुक हे निवडणुकीत राहिले असून आगामी तीन तासात किती इच्छुक माघार घेतात, यावर उमेदवार यादी निश्चित होणार आहे.
नवा ट्विस्ट
सुधीर तांबे यांनी निवडणूक अर्ज दाखल करून एक ट्विस्ट निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु ऐनवेळी त्यांनी माघार घेतल्याने मतदारांची होणारी दिशाभूल ही टळली आहे. नाशिक विभागात अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यातील इच्छुकांनी निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते.
घडामोडींकडे उमेदवारांचे लक्ष
नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या अंतिम क्षणी डॉ. सुधीर भास्करराव तांबे यांच्या ऐवजी त्यांच्या पुत्राने सत्यजित तांबे यांनी अर्ज दाखल केल्याने राजकारणाला नवीन कलाटणी मिळाली होती. त्यामुळे आता शिवसेनेने धुळे येथील शुभांगी पाटील यांना निवडणुकीसाठी पाठिंबा दर्शविला असला तरीही तीन वाजेपर्यंत यामध्ये काय घडामोडी घडू शकतात, याकडे उमेदवारांचे लक्ष लागून आहे.
पनवेलच्या डॉ. सुधीर सुरेश तांबे यांनी नामनिर्देशन पत्र दाखल करुन आमदार डॉ सुधीर भास्करराव तांबे यांचे मतदान विखुरले जाण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले होते, त्यांनाही पक्षाने एबी फॉर्म दिला नसल्याने सुधीर तांबे यांनी सोमवारी माघार घेतली आहे. अशी चर्चा महसूल आयुक्त कार्यालयात पसरली आहे.