डब्ल्यूटीसीच्या गुणतालिकेत दक्षिण आफ्रिकेची मोठी झेप, भारत कितव्या क्रमांकावर?


Advertisement

WTC 2023 Points Table: जोहान्सबर्ग येथे खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने (South Africa) भारताचा (India) सात गडी राखून पराभव केला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेच्या संघानं तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 नं बरोबरी केलीय. याशिवाय, या विजयाचा दक्षिण आफ्रिकेच्या संघाला आयसीसी वर्ल्ड टेस्ट कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठा फायदा झालाय. दहाव्या स्थानावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पाचव्या स्थानी झेप घेतली आहे. तर, भारतीय संघ चौथ्या स्थानावर कायम आहे. 

दक्षिण आफ्रिका डब्लूटीसी 2023 मध्ये त्यांची पहिलीच मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला भारताकडून पराभव पत्कारावा लागला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून दक्षिण आफ्रिकेनं मालिकेत पुनारागमन केलंय. या विजयामुळं दक्षिण आफ्रिकेचे 12 गुण झाले आहेत. दुसरीकडे भारतानं डब्लूटीसी स्पर्धेच्या अंतर्गत 9 सामने खेळले आहेत. यापैकी भारतानं चार सामने जिंकले आहेत. तर दोन सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागलाय. यातील दोन सामने अनिर्णित ठरले आहेत. भारताचे एकूण 53 गुण आहेत. 

Advertisement

ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर
अॅशेस मालिकेतील पहिले तीन कसोटी सामने जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने गुणतालिकेत अव्वल स्थान कायम राखलं आहे. त्याला 36 गुण आहेत. ऑस्ट्रेलिया डब्लूटीसीमधील पहिली मालिका खेळत आहे. यानंतर श्रीलंका 24 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. श्रीलंकेनं दोन सामने खेळले आहे. या दोन्ही सामन्यात श्रीलंकेनं विजय मिळवला आहे. पाकिस्तानचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानकडं 35 गुण आहेत. पाकिस्ताननं दोन मालिका खेळल्या आहेत. त्यांनी 3 सामने जिंकले आहेत आणि 1 मध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे.

न्यूझीलंड संघ डब्लूटीसी 2023 मध्ये आपली दुसरी मालिका खेळत आहे. त्यांनी 2 सामने गमावले आणि 1 अनिर्णित राहिला. न्यूझीलंडचा संघ अजूनही त्यांच्या पहिल्या विजयाच्या शोधात आहे. न्यूझीलंडचा संघ सातव्या क्रमाकांवर असून त्यांचे चार गुण आहेत. नुकताच न्यूझीलंडचा पराभव करणारा बांगलादेशचा संघ सहाव्या स्थानावर आहे. त्याची विजयाची टक्केवारी 33.33 टक्के आहे.

Advertisement

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP MajhaSource link

Advertisement