मुंबई, ठाणे4 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
ठाण्यातील बाळकुम परिसरात रुणवाल नावाच्या 40 मजली इमारतीची लिफ्ट कोसळली. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला. या 40 मजली इमारतीच्या छतावर वॉटर प्रूफिंगचे काम चालू होते. ते काम पूर्ण करून सर्व मजूर लिफ्टद्वारे खाली उतरत होते. त्यावेळी ही दुर्घटना घडली. मृंतामध्ये सर्व मजूरांचा समावेश आहे.
एसटी बस पेटवली, तीस लाख रुपयांचे नुकसान
हिंगोली ते कनेरगाव नाका मार्गावर चिंचाळा पाटील जवळ अज्ञात चार ते पाच व्यक्तींनी रविवारी रात्री सात वाजता महामंडळाची बस पेटवून दिल्याची घटना घडली आहे. यामध्ये सुमारे 30 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमरावती आगाराची अमरावती ते नांदेड ही बस आज रात्री सात वाजता हिंगोली ते कनेरगाव मार्गावर चिंचाळा पाटील जवळ पंक्चर झाली. त्यामुळे चालक व वाहकाने बसमधील प्रवाशांना इतर बस मध्ये बसवून दिले. त्यानंतर बसचे पंक्चर काढत असताना पाठीमागून आलेल्या चार ते पाच जणांनी बसवर पेट्रोल टाकून बस पेटवून दिली. त्यानंतर पाचही जणांनी तेथून पळ काढला.
हे वृत्त आम्ही सातत्याने अपडेट करत आहोत..