पुणे7 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
केंद्र सरकारने आयुष्मान भारत योजना, पेन्शन योजना, भारतमाला, अयोध्या रामजन्मभूमी खरेदी , सह सात योजनांमधून मोठा घोटाळा झाल्याचे ताशेरे “कॅग” ने आपल्या जाहिर केलेल्या अहवालात ओढले आहेत. मोदी सरकारच्या भ्रष्ट कारभाराच्या विरोधात शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पुणे शहराच्या वतीने भ्रष्ट केंद्र सरकारच्या विरोधात पुण्यात डेक्कन येथे सोमवारी आंदोलन करण्यात आले आहे.
कॅगने आत्तापर्यंत ज्या राज्य सरकारवर व महापालिकेवर ताशेरे ओढले त्या प्रत्येकावर कारवाई करण्यात आली. मग आता कॅगने ताशेरे ओढलेल्या, केंद्र सरकारने केलेल्या भ्रष्टाचारावर कारवाई होणार का ? यावर मोदी सरकार राजीनामा देणार का ? हा प्रश्न आंदोलकांनी विचारला.
यावेळी बोलताना शहरप्रमुख संजय मोरे यांनी मोदी सरकारचा निषेध नोंदवीत कॅगच्या अहवाला नुसार संबंधितांवर कारवाई करणार का असा प्रश्न केला ? टोल घोटाळा, हिंदुस्थान एरॉनॉटिक्स अयोध्या विकास प्रकल्प, द्वारका एक्सप्रेस वे, भारतमाला प्रकल्प, गोरगरिबांच्या आयुष्मान भारत, दिव्यांग, विधवा महिला, यांच्या योजनांमध्ये भ्रष्टाचार होत असेल तर या भ्रष्ट केंद्र सरकारने पायउतार व्हावे असे ते म्हणाले.
यावेळी आंदोलनास शहरप्रमुख संजय मोरे , उपशहरप्रमुख प्रशांत राणे, भरत कुंभारकर, बाळासाहेब भांडे , सागर माळकर , शहर संघटक राजेंद्र शिंदे , किशोर राजपूत, अनंत घरत , संतोष गोपाळ, युवासेना अधिकारी राम थरकुडे, समन्वयक युवराज पारीख, उपशहरसंघटक नितीन पवार, उमेश गालिंदे , उमेश वाघ, विभागप्रमुख प्रविण डोंगरे, मुकुंद चव्हाण, चंदन साळुंके, महेश पोकळे, योगेश पवार, राजेंद्र शाह, अजय भुवड, विलास सोनवणे, संजय वाल्हेकर, अतुल दिघे यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.