ठाकरेनी एकनाथ शिंदे प्रमाणे 10-10 खाते स्व:ताकडे ठेवले नव्हते: अंबादास दानवेंचा टोला; अजित पवारांवरही साधला निशाणा

ठाकरेनी एकनाथ शिंदे प्रमाणे 10-10 खाते स्व:ताकडे ठेवले नव्हते: अंबादास दानवेंचा टोला; अजित पवारांवरही साधला निशाणा


छत्रपती संभाजीनगरएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

उद्धव ठाकरे आमचे बॉस होते आणि ते काहीच निर्णय घेत नव्हते अशी टिका उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी केली होती. त्यावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिंदे आणि फडणवीसांकडे खात्याची संख्या मोठी आहे. मात्र उद्धव ठाकरेंनी त्यांच्याकडे केवळ दोनच खाते ठेवली होती. इतर खाते मंत्र्यांना दिली होती. त्यामुळे निर्णय घेण्याचे अधिकार मंत्र्यांनाच होते अशी टिका दानवे यांनी केली आहे.

Advertisement

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निर्णयाच्या प्रकरणात टिका केली होती. त्यावर दानवे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. मंत्रिमंडळात दोन्ही नेते असतांना मग त्यांनी काय केले असा सवाल दानवे यांनी केला आहे. तसेच कारखान्याना दिलेल्या सुटीवर देखील आक्षेप घेतला आहे. ठाकरे यांनी कधीच कोणाची फाईल अडवली नाही. मात्र चुकीचे काम होत असेल तर ते करु देखील नाही.

केवळ विशीष्ट कारखान्याला सवलतीचा लाभ का

Advertisement

रविवारी मुख्यंमत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्धव ठाकरे मुख्यंमत्री असतांना निर्णय घेत नसल्याची टिका केली होती. दानवे म्हणाले की, शिंदे हे उद्धव ठाकरेच्या सरकारमध्ये महत्वाचे मंत्री होते. त्यावेळी उद्धव ठाकरेनी कोणतीही फाईल रोखली नाही. कारखान्याच्या बाबत निधीच्या बाबत काही फाईल्स विशीष्ट कारखान्याच्या होत्या. केवळ राज्याच्या हिताची विशिष्ट कारखान्याना सवलती का असा सवाल त्यांनी केला होता. त्यावेळी ठाकरेंनी त्या दिल्या नाहीत. मात्र, आता अश्या कारखान्याला लाभ मिळत आहे. मग सर्वच कारखान्यांना या सवलती का नाही, असा प्रश्न देखील दानवे यांनी उपस्थित केला.



Source link

Advertisement