ठाकरेंची केंद्रावर कडाडून टीका: म्हणाले- महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याचा राष्ट्रीय कार्यक्रम, अशा राज्यपालांना घरी किंवा वृद्धाश्रमात पाठवामुंबई26 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

”महाराष्ट्रात मिंधे सरकार आल्यानंतर राज्याची अहवेलना होत आहे. आज अचानक कर्नाटकांच्या मुख्यमंत्र्याच्या अंगात भूत संचारले. आम्ही गप्प बसायचे हे खूप झाले. महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याचा राष्ट्रीय कार्यक्रम होत आहे. आता केंद्राने चाळे बंद करावे. राज्यपाल कोश्यारी नको. त्यांना घरी किंवा वृद्धाश्रमात पाठवा. असा हल्लाबोल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीवर झालेल्या पत्रकार परिषदेत केला.

Advertisement

भाजपची गुळगुळीत प्रतिक्रीया

ठाकरे म्हणाले, महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो हे वेगळे सांगायची गरज नाही. आणि त्यांचा अपमान झाल्यानंतर गुळगुळीत प्रतिक्रीया भाजपकडून दिल्या जात आहेत. आपल्या देशाचे कायदेमंत्री यांनी देशाच्या न्यायालयातील न्यायमूर्तीवरील नेमणुकीबद्दल मत व्यक्त केले. त्यात त्यांनी हे अधिकार पंतप्रधानांकडे हवे असे ते म्हणतात हे गंभीर आहे.

Advertisement

राज्यपाल नियुक्तीचे निकष ठरवा

ठाकरे म्हणाले, एक प्रघात आहे की, ज्याचे सरकार केंद्रात असते त्यांच्याच विचारसरणीचे आणि त्यांचीच माणसे राज्यपाल म्हणून राज्यपाल म्हणून पाठवले जाते. या माणसांची कुवत काय? वृद्धाश्रमातही जागा नाही अशांना राज्यपाल केले जातात. राज्यपाल नियुक्तीचे निकष ठरवा. राष्ट्रपतीचे ते दूत असतात. राष्ट्रपती हे निपक्ष असायला हवे ते असतात. त्याप्रमाणे राज्यपाल निपक्ष असावेत.

Advertisement

ज्यांचे सरकार केंद्रात असते त्यांच्याच विचारसरणीचे लोक राज्यपाल म्हणून राज्यात येतात. ते राज्यपाल जे काही बोलतात त्याला गांभिर्याने घेण्याची गरज आहे. आपल्या राज्याच्या राज्यपालांना मी राज्यपाल म्हणून संबोधने सोडले आहे.

शिवराय आमचे आदर्श

Advertisement

ठाकरे म्हणाले, राज्यपाल कोश्यांरींनी मुंबई आणि मराठी माणसांचा अपमान केला. तेव्हा मी म्हटले होते की, त्यांना कोल्हापुरी जोडे दाखवण्याची गरज आहे. आता तर त्यांनी शिवरायांबद्दल आक्षेपार्ह विधान केले. आदर्श हा आहेच आणि शिवराय आमचे दैवत आहे.

सडक्या मेंदुमागील सडका मेंदु कुणाचा

Advertisement

ठाकरे म्हणाले, शिवरायांबद्दलचे वक्तव्य राज्यपालाच्या काळ्या टोपीतून आली नाही. टोपीमागच्या सडक्या मेंदुमागील सडका मेंदु कुणाचा हे शोधण्याची वेळ आली आहे. मी यापूर्वी म्हटलो की, एक दोनदा होते पण सातत्याने असे प्रकार होत असतील तर याला काय म्हणावे. त्यांची वृत्ती आणि चाल याचा आम्ही निषेध केला आहेच.

महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळ

Advertisement

ठाकरे म्हणाले, हे लोक महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळत आहेत. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातेत घेऊन गेले. कॅबिनेट मिटींग अपवादात्मक परिस्थितीत पुढे ढकलले जाते पण काल काय अपवादात्मक परिस्थिती होती. गुजरात निवडणुकीसाठी बैठक पुढे ढकलली याला काय म्हणावे.

महाराष्ट्राचा सातत्याने अपमान

Advertisement

ठाकरे म्हणाले, महाराष्ट्राचा सातत्याने अपमान होत आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्रातील गावांवर दावा करीत आहेत. उपमुख्यमंत्री फडणवीस नेहमीप्रमाणे सारवासारव करीत आहेत. राज्यातील मुख्यमंत्री वरिष्ठांच्या मर्जीशिवाय बोलू चालू शकत नसतील. बोम्मई जे बोलले ते वरिष्ठांच्या परवानगीशिवाय बोलले असतील असे नाही.

हा पक्षाचा राष्ट्रीय कार्यक्रम

Advertisement

ठाकरे म्हणाले, भाजप महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा प्रयत्न करीत आहेत का, महाराष्ट्राला कंगाल करणे हा पक्षाचा राष्ट्रीय कार्यक्रम आहे का? राज्यपालांना हटवा अन्यथा आम्ही विरोध करू, आम्ही तीन चार दिवस वाट पाहतो. आत्ताच वेळ आहे सर्वांनी एकत्र येऊन महाराष्ट्रद्रोह्यांना इंगा दाखवूया.

राज्यपालांना हटवा

Advertisement

ठाकरे म्हणाले, पक्षीय राजकारणात जर आपली अस्मिता चिरडली जात असेल तर आपण काहीच करू शकत नसेल तर आपण छत्रपतींचे नाव घ्यायला नालायक आहोत. केंद्राने चाळे बंद करावे. राज्यपाल आम्हाला नको, त्या्ंना घरी पाठवा अथवा वृद्धाश्रमात पाठवा आमच्याकडे ते नको अन्यथा आम्हाला काही तरी करावे लागेल.

महाराष्ट्र बंदची हाक

Advertisement

ठाकरे म्हणाले, आम्ही आंदोलन करू स्वस्थ बसणार नाही. सर्व पक्ष एकत्र आल्यास आपण महाराष्ट्र बंद अथवा अन्य काही कृती करू आपली ताकद केंद्राला दाखवूया. भाजपचे महाराष्ट्रप्रेमींनीही आमच्यासोबत यायला हवे.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement