ट्रस्ट माध्यमातून निधी उभारून शहरांचा विकास: देशभरात 35 महानगरपालिकेत मेक्सिकन मॉडेल राबवण्याचा विचार : अरोकीराज


पुणे16 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

मेक्सिकोमध्ये ट्रस्ट स्थापन करून महापालिका स्वतःचा ब्रँड आधारे शहर विकसित करण्यासाठी निधी उभा करण्याचे मॉडेल यशस्वी ठरले आहे. त्याआधारे भारतातही अशा प्रकारे निधी उभारण्याची क्षमता असलेल्या ३५ महानगरपालिकांची यादी तयार करण्यात आली आहे. भविष्यात मेक्सिकन मॉडेलच्या आधारे शहरांचा विकास साधणार आल्याची माहिती केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या आर्थिक घडामोडी या विभागाचे संयुक्त सचिव सॉलोमन अरोकीराज यांनी मंगळवारी दिली.

Advertisement

पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या जी २० राष्ट्रांच्या प्रतिनिधींच्या इन्फ्रास्ट्रक्चर वर्किंग ग्रुपच्या २ दिवसीय बैठकीचा समारोप झाला. त्या वेळी सॉलोमन बोलत होते. विविध देशात जसे अमेरिका, मेक्सिको इतर ठिकाणी कोणते प्रकल्प यशस्वी ठरले, त्याचे सादरीकरण करण्यात आले.

विद्यापीठात सांस्कृतिक परिचय : १८ देशांचे प्रतिनिधी उपस्थित परदेशी पाहुण्यांसाठी पुणे विद्यापीठात महाराष्ट्रासह देशातील सांस्कृतिक कार्यक्रमाचा परिचय करून देण्यात आला. दोन दिवसांच्या सत्रात १८ देशांतून ६४ प्रतिनिधी, ८ आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रतिनिधी व ८ निमंत्रित देशांचे प्रतिनिधी बैठकीस प्रत्यक्ष उपस्थित होते. शाश्वत शहरांच्या विकासाबरोबरच पर्यावरणाचा समतोल राखण्याचे आव्हान महत्त्वाचे आहे. पाणी हवामान बदल नैसर्गिक आपत्ती असे नवे प्रश्न निर्माण होऊ लागल्याचे मत मांडण्यात आले. शहरी विकासासाठी खाजगी अर्थसाहाय्य आकर्षित करण्याबाबत विविध देशांची यशोगाथा परिषदेत चर्चिली गेली. यापुढील विषयवार धोरणे ठरवण्यासाठी जी २० परिषद मार्च, जून आणि ऑक्टोबरमध्ये होणार आहे. मार्चमध्ये विशाखापट्टणमला परिषद होईल.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement