टेंडर प्रक्रियेत भाजपचा हस्तक्षेप: पुणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मनपासमाेर आंदाेलन, भ्रष्टाचाराचा केला आरोप


पुणे20 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

रस्ते कामातील निविदेतील अटी-शर्ती दुरुस्त करुन पुन्हा निविदा काढाव्या व संबंधित अधिकाऱ्यांची चाैकशी करावी या मागणीसाठी पुणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुणे मनपा समाेर शुक्रवारी जाहीर आंदाेलन करण्यात आले.

Advertisement

पुणे शहरातील विविध भागात रस्त्याच्या कामाच्या निविदेत ठराविक ठेकेदाराला डाेळयासमाेर ठेवून रस्त्याच्या कामाची निविदा तयार करण्यासाठी व त्यात दबाव आणून स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी सत्ताधारी भाजप पक्षाचे आमदार, माजी आमदार, माजी पक्षनेते व पदाधिकारी अन्य ठेकेदारांना धमकावत आहे.

भाजपचा वावर वाढला

Advertisement

पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, मागील दहा महिन्यापासून पुणे मनपात प्रशासकीय राज आहे. पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार हे प्रशासक म्हणून काम पाहतात. राज्यातील सत्तांतर सात ते आठ महिन्यापूर्वी झाले आणि एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले. तेव्हापासून भाजपचा वावर मनपात वाढला असून अनेक टेंडर या काळात मनपात झाले आहे.

प्रशासनावर दबाव

Advertisement

प्रशांत जगताप म्हणाले, टेंडर प्रक्रियेत भाजप पदाधिकारी यांचा हस्तक्षेप असताे. सर्व टेंडर भरणाऱ्यांशी भाजप नेत्यांचा संपर्क मागील काही दिवसात वाढलेला आहे. आपल्या नातेवाईकां जवळच्या लाेकांना टेंडर मिळवून देण्यासाठी भाजपचे नेते प्रशासनावर दबाव टाकत आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे नाव वापरुन टेंडर मिळवले जात आहे.

न्यायालयात दाद मागू

Advertisement

प्रशांत जगताप म्हणाले, प्रशासनला आमचा इशारा आहे की, पुणेकरांचे कराचे पैसे अशाप्रकारे भ्रष्टाचारास वापरले जाऊ नये. भाजपच्या लाेकांचे खिसे व तिजाेरी भरण्यास हे पैसे वापरले गेल्यास आम्ही न्यायालयात दाद मागू. पुणेकर मतदार आगामी काळात भाजपला धडा शिकवेल.

साटेलाेटे उघडकीस

Advertisement

प्रशांत जगताप म्हणाले,​​​​​​​ पुणेकरांचे हित जपण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरुन आंदाेलन करत आहे. परंतु भाजपचा भ्रष्टाचारी मुखवटा पुराव्यासह न्यायालयात आम्ही मांडणार आहे. जी-20 परिषद अनुषंगाने अल्पावधीत टेंडर काढण्यात आली यातून मनपा अधिकारी व ठेकेदार यांचे साटेलाेटे उघडकीस आले अहे. भाजप व प्रशासनाने त्यांचे अपयश लपविण्यासाठी चुकीच्या पध्दतीने नागरिकांचे पैसे वाया घालवले आहे.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement