टी-20 विश्वचषक, आशिया चषक, 2022 मध्ये टीम इंडिया व्यस्त; पाहा वर्षभराचं वेळापत्रक 


Advertisement

Team India Calendar 2022 : नवीन स्वप्न आणि आशा-आकांक्षांसह नववर्षाला सुरुवात झाली आहे. जगभरात नववर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. दक्षिण आफ्रिका संघाचा पहिल्या कसोटीत पराभव करत भारतीय संघाने 2021 वर्षाचा शेवट गोड केला. 2022 या वर्षात भारतीय संघ व्यस्त राहणार आहे. टीम इंडिया विदेशात आणि देशातही विविध सामने खेळणार आहे. यंदा टी-20 चा विश्वचषक ऑस्ट्रेलियात होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात होणाऱ्या या विश्वचषकाकडे भारतीय क्रीडा चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. 2013 नंतर भारतीय संघाला एकही आयसीसी चषक जिंकता आलेला नाही.  नव्या वर्षात तीन जानेवारीपासून भारतीय संघ दक्षिण आफ्रिकाविरोधात दुसरा कसोटी सामना खेळणार आहे. तीन सामन्याच्या मालिकेत भारतीय संघाने 1-0 ने आघाडी घेतली आहे. कसोटी मालिकेनंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकाविरोधात एकदिवसीय मालिकाही खेळणार आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरुन परतल्यानंतर मायदेशात श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या संघाविरोधात टीम इंडिया दोन हात करणार आहे. त्यानंतर आयपीएल, इंग्लंड दौरा, आशिया चषक, टी-20 विश्वचषक.. यासारख्या स्पर्धा होणार आहेत. 2022 मधील भारतीय संघाच्या वेळापत्रकावर नजर मारुयात…. 
 
भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा – 
कसोटी सामने –
26 डिसेंबर, 2021 ते 30 डिसेंबर, 2021 सुपरस्पोर्ट पार्क, सेन्चुरियन…. भारताचा 113 धावांनी विजय
3 जानेवारी,2022 ते 7 जानेवारी, 2022 न्यू वांडरर्स मैदान, जोहान्सबर्ग.
11 जानेवारी, 2022 ते 15 जानेवारी, 2022 न्यू लँड्स, केपटाऊन  

एकदिवसीय सामने – 
19 जानेवारी 2022 – बोलंड पार्क, पार्ल – दुपारी दोन वाजता
21 जानेवारी 2022 – बोलंड पार्क, पार्ल – दुपारी दोन वाजता
23 जानेवारी 2022 – न्यू लँड्स क्रिकेट ग्राऊंड, केपटाऊन – दुपारी दोन वाजता

Advertisement

वेस्ट इंडिजचा भारत दौरा 
एकदिवसीय मालिका –
6 फ्रेबुवारी 2022 – अहमदाबाद
9 फेब्रुवारी 2022 – जयपूर
12 फेब्रुवारी 2022 – कोलकाता
टी-20 मालिका
15 फ्रेब्रुवारी 2022 – कटक
18 फेब्रुवारी 2022 – विशाखापट्टनम
20 फेब्रुवारी 2022 – त्रिवेंद्रम 

श्रीलंकेचा भारत दौरा – 
कसोटी मालिका 
25 फ्रेब्रुवारी ते एक मार्च – बंगळुरु
5 ते 9 मार्च – मोहाली

Advertisement

टी – 20 मालिका – 
13 मार्च – मोहाली
15 मार्च – धर्मशाला
18 मार्च – लखनौ

एप्रिल – मे यादरम्यान आयपीएलचे सामने होण्याची शक्यता  

Advertisement

दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा – 
टी-20 मालिका – 
9 जून – चेन्नई
12 जून – बंगळुरु
14 जून – नागपूर
17 जून – राजकोट
19 जून – दिल्ली 

भारताचा इंग्लंड दौरा – 
रिशड्युल कसोटी सामना – 1 जुलै ते 5 जुलै – बर्मिगहॅम

Advertisement

टी – 20 मालिका – 
7 जुलै –  साउथम्प्टन
9 जुलै – बर्मिगहॅम
10 जुलै – Nottingham 

एकदिवसीय मालिका – 
12 जुलै – लंडन
14 जुलै – लंडन
17 जुलै – मँचेस्टर
 
भारताचा वेस्ट इंडिज दौरा 
तीन एकदिवसीय सामने आणि तीन टी-20 मालिका – वेळापत्रक अद्याप जारी करण्यात आलेले नाही. जुलै – ऑगस्ट यादरम्यान सामने होण्याची शक्यता आहे. 

Advertisement

आशिया चषक (सप्टेंबर)
ठिकाण आणि तारखाबाबत अद्याप घोषणा नाही. 
 
भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा – 
भारत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर चार कसोटी, तीन टी-20 मालिका खेळणार आहे. तारीख आणि ठिकाणाबाबत अद्याप घोषणा झालेली नाही. भारत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर सप्टेंबर – ऑक्टोबर या काळात असणार आहे. 

टी- 20 विश्वचषक (ऑक्टोबर – नोव्हेंबर)
ऑस्ट्रेलियात होणारा टी-20 चा विश्वचषक ऑक्टोबर – नोव्हेंबर यादरम्यान होणार आहे. तारीख आणि ठिकाणाबाबत अद्याप घोषणा झालेली नाही. 
 
बांगलादेशचा भारत दौरा – 
नोव्हेंबर-डिसेंबर यादरम्यान बांगलादेश भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. दोन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्याची मालिका होणार आहे. तारीख आणि ठाकाणीबाबत अद्याप घोषणा झालेली नाही. 

AdvertisementSource link

Advertisement