टी-२० चॅलेंज २०२२ महिला आयपीएल स्पर्धेत विजेता संघ आणि विजेता खेळाडूंना मिळालेली बक्षिसांची रक्कम, वाचा…

टी-२० चॅलेंज २०२२ महिला आयपीएल स्पर्धेत विजेता संघ आणि विजेता खेळाडूंना मिळालेली बक्षिसांची रक्कम, वाचा...
टी-२० चॅलेंज २०२२ महिला आयपीएल स्पर्धेत विजेता संघ आणि विजेता खेळाडूंना मिळालेली बक्षिसांची रक्कम, वाचा...

शनिवारी महिला टी२० चॅलेंज २०२२चा अंतिम सामना व्हेलोसिटी विरुद्ध सुपरनोव्हाज संघात खेळला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सुपरनोव्हाजने निर्धारित २० षटकात ७ विकेट्सच्या नुकसानावर १६५ धावा केल्या. सुपरनोव्हाजकडून डिएंड्रा डॉटिनने सर्वाधिक ६२ धावा केल्या. तसेच कर्णधार हरमनप्रीत कौरने ४३ धावांचे योगदान दिले. प्रत्युत्तरात व्हेलोसिटीकडून लॉरा वॉलवार्टच्या झुंजार अर्धशतकी खेळीव्यतिरिक्त इतर फलंदाजांनी नांग्या टाकल्या. परिणामी व्हेलोसिटीला २० षटकांमध्ये ८ विकेट्स गमावत १६१ धावाच करता आल्या. अशाप्रकारे सुपरनोव्हाजने ४ धावांनी हा सामना जिंकला.

हरमनप्रीतच्या नेतृत्त्वाखालील सुपरनोव्हाजने आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची ही तिसरी वेळ आहे. महिला टी२० चॅलेंजच्या ४ हंगामांच्या इतिहासात सुपरनोव्हाजने सर्वाधिक वेळा ट्रॉफी जिंकली आहे. यापूर्वी २०१८ आणि २०१९ मध्ये सुपरनोव्हाजने आयपीएल ट्रॉफीवर आपले नाव कोरले होते. तर व्हेलोसिटीने अंतिम सामन्यात पोहोचण्याची ही दुसरी वेळ होती व दोन्हीही वेळी त्यांना सुपरनोव्हाजनेच पराभूत केले होते. तसेच ट्रेलब्लेझर्स संघ केवळ एक वेळा, २०२० मध्ये विजेतेपद पटकावले होते.

Advertisement

दरम्यान महिला टी२० चॅलेंज २०२२च्या हंगामात अनेक विक्रमतोड गोष्टी घडल्या आहेत. सर्वोच्च सांघिक धावसंख्या, सर्वोच्च धावसंख्येचा यशस्वी पाठलाग आणि बरेच विक्रम झाले आहेत. या हंगामातील अशाच काही आकड्यांचा येथे आढावा घेण्यात आला आहे.

पुरस्कार

विजेते: सुपरनोव्हाज – २५ लाख रु

Advertisement

माय ११ सर्कल परफॉर्मर ऑफ द मॅच (अंतिम सामन्यातील सामनावीर): डिएंड्रा डॉटिन (सुपरनोव्हाज) – ४४ चेंडूत ६२ धावा – रु १ लाख

NFT विजयी क्षण: सोफी एक्लेस्टोन (सुपरनोव्हाज) – रु १ लाख

Advertisement

फ्लॅश सुपरस्टार ऑफ द डे: डिएंड्रा डॉटिन (सुपरनोव्हाज) – ९४ पॉइंट्स – १ लाख रु

बूस्ट स्टॅमिना स्टार ऑफ द मॅच: डिएंड्रा डॉटिन (सुपरनोव्हाज) – २६२ पॉइंट्स – १ लाख रु

Advertisement

माय ११ सर्कल चॅम्पियन परफॉर्मर ऑफ द टूर्नामेंट (मालिकावीर) ): डिएंड्रा डॉटिन (सुपरनोव्हाज) – १३७ गुण – २.५० लाख रु

Advertisement