टी-२० चॅलेंज मध्ये हरमनप्रीत कौरने हवेत झेपावत सुंदर झेल टिपला; दिग्गजांकडून कौतुक

टी-२० चॅलेंज मध्ये हरमनप्रीत कौरने हवेत झेपावत सुंदर झेल टिपला; दिग्गजांकडून कौतुक
टी-२० चॅलेंज मध्ये हरमनप्रीत कौरने हवेत झेपावत सुंदर झेल टिपला; दिग्गजांकडून कौतुक

वुमन्स टी-२० चॅलेंज २०२२ च्या दुसऱ्या सामन्यात भारतीय टी-२० संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने हवेत झेप घेत अप्रतिम झेल घेतला. टी-२० चॅलेंजचा दुसरा सामना वेलोसिटी विरुद्ध सुपरनोवाज यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात झंझावाती खेळी करणाऱ्या शेफाली वर्माचा हरमनप्रीतने अविश्वसनिय झेल घेत तिला बाद केले. सामन्यानंतर सर्वत्र हरमनप्रीतच्या झेलची चर्चा रंगताना दिसली.गावसकरांनी फ्लाइंग लेडी दबंग असे म्हणत माझ्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट झेल असे म्हटले. तर अंजुम चोप्राने इंग्लिश संघांना आता भारतीय महिला संघ अजून जास्त टफ देईल असे म्हणत कौतुक केले. रवी शास्त्रींनी तर मला देखील असा झेल पकडायला शिकव अशी मागणी हरमनकडे केली आहे.

युवा सलामीवीर शेफाली वर्मा (५१) आणि लॉरा वूलवार्ड (नाबाद ५१) यांच्या बळावर वेलोसिटीने महिला टी- २० चॅलेंजच्या दुसऱ्या सामन्यात सुपरनोवाजचा ७ गडी राखून पराभव केला. शेफालीने ३३ चेंडूंच्या खेळीत एक षटकार आणि नऊ चौकार लगावले, तर वूलवार्डने ३५ चेंडूंच्या खेळीत ७ चौकारांसह एक षटकार लगावला. या सामन्यात सुपरनोवाजची कर्णधार हरमनप्रीत कौरचा झेल आकर्षणाचा केंद्रबिंदू होता. हरमनप्रीतने हवेत उडी घेत एका हाताने झेल घेतला आणि शेफालीची अर्धशतकी खेळी संपवली.

झाले असे की, वेलोसिटीच्या डावाच्या १० व्या षटकांत सुपरनोवाज गोलंदाज डायंड्रा डॉटिनने ऑफ स्टंपच्या बाहेर एक शॉर्ट चेंडू टाकला. या चेंडूवर शेफालीने जोरदार फटका लगावला. हरमनप्रीत कौर क्षेत्ररक्षण करत असलेल्या शॉर्ट थर्ड मॅनकडे चेंडू गेला. वेळ न घालवता हरमनप्रीतने हवेत डायव्हिंग टाकत तिच्या डाव्या हाताने झेल घेतला. हरमनप्रीतच्या या शानदार झेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चाहते त्याचे कौतुक करत आहेत.

Advertisement

दरम्यान, शेफालीने ३० चेंडूत अर्धशतक पूर्ण केले, जे या स्पर्धेतील सर्वात जलद अर्धशतक ठरले आहे. हरमनप्रीत कौरच्या ५१ चेंडूत ७१ धावांच्या झंझावाती खेळीच्या जोरावर सुपरनोवाज संघाने ५ बाद १५० धावा केल्या. वेलोसिटीने १० चेंडू बाकी असताना ३ गडी गमावून लक्ष्याचा पाठलाग सहज पूर्ण केला. दीप्ती आणि वूलवार्ड या जोडीने ७१ धावांची अखंड भागीदारी करून संघाला विजय मिळवून दिला.

Advertisement