टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने जपला लोकमान्यांच्या विचारांचा वारसा: टिमविचा पदवीप्रदान समारंभात राजीवकुमार विष्णोई यांचे गौरवोद्गार


  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Tilak Maharashtra University Preserves The Legacy Of Popular Thought Rajiv Kumar Vishnoi’s Honorable Team Graduation Ceremony Concluded

पुणे27 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

शंभरी पूर्ण केलेल्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने लोकमान्य टिळकांच्या राष्ट्रीय शिक्षणाचा वारसा जपला असून, आजही हे विद्यापीठ लोकमान्यांच्या विचाराने पुढे जात आहे, असे मत टेहरी धरण प्रकल्पाचे शिल्पकार राजीव कुमार विष्णोई यांनी शनिवारी व्यक्‍त केले.

Advertisement

टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा शनिवारी येथे पार पडला. या वेळी ज्येष्ठ उद्योगपती संजय किर्लोस्कर, टेहरी धरण प्रकल्पाचे शिल्पकार राजीवकुमार विष्णोई, प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले आणि ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे यांना सन्मानीय डी.लिट. (विद्यानिधी) देऊन गौरविण्यात आले. त्या वेळी विष्णोई बोलत होते. विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक टिळक, प्रभारी कुलगुरु डॉ. गीताली टिळक, टिमवि ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉ. रोहित टिळक, विश्‍वस्त डॉ. प्रणती टिळक, प्रभारी कुलसचिव डॉ. अभिजित जोशी आदी उपस्थित होते.

विविध विद्या शाखांचे अधिष्ठाता यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी 50 विद्यार्थ्यांना पीएच.डी. पदवी, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या 1 हजार 235 तर पदवी अभ्यासक्रमाच्या 2 हजार 234 विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. कौशल्य विकास शाखेच्या 161 पदवी अभ्यासक्रमाच्या 161 विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी सुवर्ण पदके मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा पदके देऊन गौरव करण्यात आला. विद्यापीठाचे माजी पीएच.डी. विद्यार्थी व निवृत्त प्राध्यापक डॉ. रामदास आबणे यांना पोस्ट डॉक्टरल प्रदान करण्यात आली.

Advertisement

संजय किर्लोस्कर म्हणाले, माझे पणजोबा आणि लोकमान्य टिळक यांची भेट झाली होती. माझ्या पणजोबांनी शेती अवजारांची कंपनी स्थापन केली होती. मात्र त्यांना इंग्रज शेतकर्‍यांना नांगरासह अवजारांची विक्री करु देत नाहीत, त्यांच्याकडून कोणतेही सहकार्य मिळत अशी अर्धा तास चर्चा लोकमान्यांशी पणजोबांनी केली होती. त्यावेळी लोकमान्यांनी त्यांना विश्‍वास दिला होता, तुम्ही देशसेवेसाठी काम करीत आहात. स्वराज्य मिळाल्यावर तुमच्याकडून देशसेवेबरोबर व्यवसायदेखील जगाच्या कोनाकोपर्‍यापर्यंत जाईल, अशी उभारी लोकमान्यांकडून किर्लोस्करांना दिली होती.

तंत्रज्ञानात वेगाने बदल होत असून हे तंत्रज्ञान समजून आम्ही काम केले आहे. देशातील सर्वांत जुनी कंपनी म्हणून किर्लोस्करची ओळख असल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले. प्रभारी कुलसचिव डॉ. अभिजित जोशी यांनी प्रास्ताविक केले. प्रभारी कुलगुरु डॉ. गीताली टिळक यांनी विद्यापीठातील विविध विभागांचा आढावा घेतला. सूत्रसंचालन वसुंधरा काशीकर यांनी केले.

Advertisement

काळ झपाट्याने बदलत आहे. काळाप्रमाणे तंत्रज्ञानही बदलत आहे. शासकीय नोकर्‍या कमी होत आहेत. त्यामुळे नवीन तंत्रज्ञान शिका त्यातून बदल घडवित प्रगतीचे मार्ग स्विकारा. करण तुमच्या प्रगतीतच राष्ट्राची प्रगती आहे. असे प्रतिपादन टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक टिळक यांनी केले.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement