औरंगाबाद7 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
ऑनलाइन जुगाराने हैदोस घातला आहे. यात सुशिक्षित बेरोजगार तरुण वाहत जात असून कुटुंबाचे कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. जुगाराविरोधात पोलिस प्रशासन कुठली कारवाई करत नाही, हे आश्चर्यकारक असून धक्कादायक देखील आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते जुगाराची जाहिरात करताना दिसून येत आहे. हा अतिशय गंभीर प्रकार आहे. या सर्वांवरती कायदेशीर कारवाई करावी. तसेच ऑनलाइन जुगार त्वरित बंद करावा. अन्यथा झुंजार छावा तीव्र आंदोलन छडेल. अशी माहिती संस्थापक अध्यक्ष सुनील कोटकर यांनी दिली. तसेच या मागणीसाठी कुंभेफळ रस्त्यावर लक्षवेधी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
विविध ऑनलाइन जुगार आणि गेमच्या माध्यमातून तरुणाची फार मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे. ऑनलाइन गेम मुळे कर्जबाजारी तरुण वर्ग गुन्हेगारीकडे वळत आहेत. त्या ऑनलाइन गेमच्या माध्यमातून शासनाला कर मिळत असेल परंतु कर मिळतो म्हणून कशालाही शासन परवानगी देईल का? असे असेल तर नेहमी निसर्गाची अवकृपा असलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना शासनाने गांजा पिकवण्याचा परवाना द्यावा. अशी मागणी आंदोलकांनी केली.
जगाच्या पाठीवर सर्वात जास्त तरुणांची संख्या असलेले एकमेव देश भारत आहे. त्यांना योग्य मार्गदर्शन करून देशहितासाठी त्या शक्तीचा वापर करण्याऐवजी ऑनलाइन गेम च्या माध्यमातून तरुणाईला उध्वस्त करण्याचा हा डाव सुरू आहे. याचा खेद वाटतो व संताप अनावर होतो आहे. या विरोधात झुंजार छावा संघटनेच्या वतीने सोमवारी जालना रोड कुंभेफळ चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. रस्त्याच्या दोन्ही बाजूला दोन किमी पर्यंत वाहनाच्या रंगाच्या रंग लागल्या होत्या. वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी कारवाई चे आश्र्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले, असे सुनील कोटकर म्हणाले. यावेळी केंद्रीय कार्याध्यक्ष निलेश ढवळे पाटील, प्रदेश अध्यक्ष विठ्ठलराव माने, प्रदेश सचिव सचिन खरात, प्रदेश कार्याध्यक्ष संतोष काळे, सचिन हिवाळे पाटील, ज्ञानेश्वर गायकवाड निवृत्ती डक आदींनी आंदोलनांचे नेतृत्व केले.