ज्योतिषशास्त्र भारताने जगाला दिलेली देणगी: जागतिक संशोधनांची पाळेमुळे भारतीय संस्कृतीशी येऊन ठेपतात – डॉ. गोसावी


पुणेएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

जागतिक स्तरावर लागलेल्या अनेक संशोधनांची पाळेमुळे भारतीय संस्कृतीशी येऊन ठेपतात. तेच सूत्र आणि तत्व भारतीय ज्योतिषशास्त्राला लागू पडते. ज्योतिषशास्त्र ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे, असे मत ज्येष्ठ ज्योतिष अभ्यासक आणि संशोधक डॉ. मो. स. गोसावी यांनी रविवारी व्यक्त केले.

Advertisement

ज्योतिषशास्त्राचे गाढे अभ्यासक आणि संशोधक पं. विजय श्रीकृष्ण जकातदार यंदा ७५ व्या वर्षात पर्दापण करत आहेत. यानिमित्त बृहन्महाराष्ट्र ज्योतिष मंडळ आणि फलज्योतिष सभासद मंडळातर्फे पं. विजय जकातदार यांचा अमृत महोत्सवी सत्कार आज माजी आमदार उल्हास पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून डॉ. मो. स. गोसावी बोलत होते.

बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या या सत्कार सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर शाहू मोडक प्रतिष्ठानच्या अध्यक्षा प्रतिभा शाहू मोडक, फलज्योतिष अभ्यास मंडळाच्या समन्वयक आरती घाटपांडे, बृहन्महाराष्ट्र ज्योतिष मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर जकातदार, सतीश जकातदार, जयश्री विजय जकातदार, डॉ. वा.ल. मंजूळ, चंद्रकांत शेवाळे, आनंदकुमार कुलकर्णी, प्रा. जवाहर मुथा आणि मोहन दाते आदी मान्यवर उपस्थित होते.

Advertisement

यावेळी बोलताना डॉ. मो. स. गोसावी म्हणाले की, ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक हे संकटाला सामोरे जाण्याची मानसिकता घडवून त्या संकटांना सामोरे जाण्याची तादक देतात. हे शास्त्र समाजाला मार्गदर्शन करणारे आणि शक्ती देणारे असून भारतात गणित आणि खगोल-अवकाश शास्त्राच्या झालेल्या विकासामुळे भारतीय ज्योतिषशास्त्र हे परिपक्व आणि परिपूर्ण आहे. ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करणारे भरपूर आहेत, मात्र जकातदार कुटुंबियांनी या शास्त्राचा शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करता यावा म्हणून निर्माण केलेली विपूल ग्रंथसंपदा ही जमेची बाजू आहे. या क्षेत्रात येऊ पाहणारे तरूण अभ्यासक जकातदार कुटुंबियांच्या या योगदानाबद्दल कृतज्ञ राहतील.

ज्योतिषशास्त्राला अभ्यासक्रमाच्या कक्षेत आणून ठिकठिकाणी देणाऱ्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून ज्योतिषशास्त्र अभ्यासकांची नवीन पिढी घडविली आहे. स्वतःच्या जीवनासह संकटग्रस्त व्यक्तीच्या जीवनाला दिशा देण्याचे काम हे शास्त्र करते. समाजाने या शास्त्राप्रती आस्था बाळगत या शास्त्राला दाद देत सहभाग वाढवला पाहिजे. जकातदार कुटुंबियांचे या क्षेत्रातील योगदान अनमोल असून या विषयासंदर्भातील विपूल ग्रंथनिर्मिती आणि सामाजिक पातळीवरील याची स्वीकार्हता वाढविण्यात जकातदार कुटुंबियांच्या तिसऱ्या पिढीचे मोठे योगदान आहे.

Advertisement

यावेळी बोलताना उल्हास पवार म्हणाले की, अवकाश आणि खगोलशास्त्रा संदर्भात लागलेले शोध आज गॅलिलिओच्या नावावर मांडले गेले असले तरी त्याची मूळ संकल्पना आणि वास्तववादी मांडणी संत ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांच्या ओव्यांमधून गॅलिलीओच्या देखील आधी केली आहे. लोकमान्य टिळक देखील या शास्त्राचे गाढे अभ्यासक होते. या क्षेत्रात श्रीकृष्ण जकातदार यांच्यापासून सुरू झालेली परंपरा तिसऱ्या पिढीपर्यंत येऊन ठेपली आहे. या शास्त्राच्या अभ्यासासाठी चिंतन, मनन आणि संशोधन आवश्यक असते. भारतीय अध्यात्मात खंडन-मंडन स्वागतार्ह असून असे खंडन-मंडन या शास्त्राच्या बाबतीतही केले जाते.

विजय जकातदार म्हणाले की, आजच्या या सत्कारामुळे माझ्या मनात कृतार्थ भाव निर्माण झाला आहे. ज्योतिषाकडे मी एखाद्या शिल्पकाराप्रमाणे पाहतो. ज्या पद्धतीने शिल्पकाराला दगडातील मूर्ती दिसते, त्याच मानसिकतेतून आम्ही ज्योतिषकारांनी समोरच्याच्या अवगुणांचे दर्शन घडविण्याऐवजी त्याच्यातील सकारात्मक बाबी निदर्शनास आणून दिल्या पाहिजे. ज्योतिषशास्त्र हे समोरच्याला घाबरविण्यासाठी नसून येणाऱ्या संकटांविषयी अवगत करून त्या संकटांना सामोरे जाण्याची शक्ती निर्माण करणारे शास्त्र आहे.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement