जोर्तिलिंगांच्या विकासासाठी 300 कोटींची तरतूद: राज्यातील प्राचीन मंदिरांची विकासकामे हाती घेणार, कीर्तनकारांसाठी भरीव निधी



मुंबई27 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

राज्यातील पाच जोर्तिलिंगांच्या विकासासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे. सह्याद्री पर्वतात स्थित असणाऱ्या पुण्यातील भिमाशंकर जोर्तिलिंगांसह, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, औंढा नागनाथ, वैजनाथ या पाचही मंदिरांच्या विकास आणि संवर्धनासाठी 300 कोटींचा निधी जाहीर करण्यात आला आहे.

Advertisement

प्राचीन मंदिरांची विकासकामे

राज्यातील प्राचिन मंदिराच्या विकासाची कामे हाती घेण्यात येणार असल्याचे फडणवीस म्हणाले. श्री क्षेत्र ज्योतिबा परिसर संवर्धन प्राधीकरण स्थापन करून त्याकरता 50 कोटींचा निधी देण्यात येणार आहे. तरी श्री संत गाडगेबाबा समाधीस्थळ येथील ऋणमोचन विकासासाठी 25 कोटी रुपयांचा निधी जाहीर झाला आहे. हे वर्ष चक्रधर स्वामींचे अष्टशताब्दी वर्ष असल्याने महानुभाव पंथासाठी महत्वपूर्ण असणाऱ्या देवस्थानांचा विकास करण्यासाठी भरीव तरतूद करण्यात येणार आहे.

Advertisement

नाचू कीर्तनाचे रंगी..

वारकरी संप्रदायाने महाराष्ट्राला एक संपन्न वारसा दिला आहे. अनेक कीर्तनकार, निरूपणकार अध्यात्मिक संदेश तर देतात पण त्याच बरोबर अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती करून राष्ट्रचारित्र्य घडवत आहेत. राष्ट्रनिर्माणाच्या सच्च्या पायिकांसाठी श्री नामदेव महाराज कीर्तनकार सन्मान योजना राबवण्यात येणार आहे. प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज स्मारकासाठी भरीव निधी देण्यात येणार आहे.

Advertisement

किती निधी देणार?

महाराष्ट्राचे वैभव असलेल्या धार्मिक क्षेत्रांचा विकास करण्यासाठी निधी देण्यात आला आहे.

Advertisement
  • श्री संत सेवालाल महाराज स्मारक पोहरादेवी, उमरी तीर्थक्षेत्र विकास : 500 कोटी रुपये
  • भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, औंढा नागनाथ, वैजनाथ या पाचही महाराष्ट्रातील ज्योर्तिंलिंगांसह प्राचीन मंदिरांच्या संवर्धनासाठी : 300 कोटी रुपये
  • श्री क्षेत्र ज्योतिबा परिसर संवर्धन प्राधीकरण : 50 कोटी रुपये
  • श्री संत गाडगेबाबा समाधीस्थळ, ऋणमोचन विकासासाठी : 25 कोटी रुपये
  • श्री चक्रधर स्वामी महानुभाव संबंधित रिद्धपूर, काटोल, भिष्णूर, जाळीचा देव, पोहीचा देव, नांदेड, पांचाळेश्वर, पैठण विकासासाठी भरीव निधी
  • प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज स्मारकासाठी भरीव निधी
  • गहिनीनाथ गडाच्या संवर्धन-विकासासाठी : 25 कोटी रुपये
  • श्री संत जगनाडे महाराज आर्ट गॅलरी, नागपूर: 6 कोटी रुपये
  • श्री संत जगनाडे महाराज समाधीस्थळ, सुदुंबरे (पुणे) : 25 कोटी रुपये

बातम्या आणखी आहेत…



Source link

Advertisement