जैन प्रमियर लीग: जैन ओवेन्सची नवकारवर मात; हर्षल पाटणी ठरला सामनावीर


औरंगाबादएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

सकल जैन समाजातर्फे जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मैदानावर आयोजित जैन प्रीमियर लीग स्पर्धेत जैन ओवेन्स संघाने नवकार लॉयन्स संघावर 36 धावांनी विजय मिळवला. या लढतीत हर्षल पाटणी सामनावीर पुरस्काराच मानकरी ठरला.

Advertisement

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना जैन संघाने 10 षटकांत 4 बाद 122 धावा उभारल्या. यात सलामीवीर अमित चोपडाने 7 चेंडूंत 2 चौकार व 1 षटकार लगावत 17 धावा केल्या. सौम्य काला 7 धावांवर परतला. हर्षल पाटणीने शानदार अर्धशतक झळकावले. त्याने 27 चेंडूंचा सामना करताना 5 चौकार व 5 षटकार खेचत नाबाद 68 धावांची खेळी केली. सारस कालाने 16 चेंडूंत 1 चौकार व 2 षटकार मारत 21 धावा करत संघाला शंभरी गाठून दिली. नवकारतर्फे तर्थी सेठने 11 धावा देत 2 गडी बाद केले. स्वराज महाजनने एकाला टिपले.

प्रत्युत्तरात नवकार लॉयन्स निर्धारित षटकांत 6 बाद 86 धावा करू शकला. यात सलामीवीर मयुर लिंगायतने 12 चेंडूंत 1 चौकार व 3 षटकारासह सर्वाधिक 27 धावा काढल्या. दुसरा सलामीवीर हर्ष जैनने 6 चेंडूंत फटकेबाजी करत 3 चौकार व 1 षटकार खेचत 20 धावा केल्या. अमित काला 20 धावांवर नाबाद राहिला. इतर फलंदाजांनी निराशा केली. त्यांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. जैनकडून सौरभ गंगवालने 19 धावा देत 3 बळी घेतले. विपिन झनझारी, अाकाश कासलिवाल व ऋषभ जैनने प्रत्येकी एक-एक गडी बाद केला.

Advertisement

जैन टॅग सुपरकिंग्जचा विजय

दुसऱ्या लढतीत जैन टॅग सुपरकिंग्ज संघाने गादिया द लीजेंड संघावर 7 गड्यांनी मात केली. प्रथम खेळताना गादियाने 10 षटकांत 8 बाद 73 धावा उभारल्या. प्रत्युत्तरात जैन टॅग सुपरकिंग्जने 8.4 षटकांत 3 गडी गमावत विजयी लक्ष्य गाठले. यात पारस गंगवालने 11, अंकुश पाटणीने नाबाद 24 व कार्तिक बाकलिवालने नाबाद 23 धावांची विजयी खेळी केली. गादियाकडून युवराज साहुजी व आदित्य देवराने प्रत्येकी एकाला टिपले.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement