आयपीएलमध्ये लखनऊ विरुद्ध गुजरात सामन्यात एक अजब चमत्कार घडला. जे दोन क्रिकेटपटू एकमेकांचे तोंडही पाहात नाहीत ते दोघं एकाच संघामधून खेळत आहेत. दीपक हुड्डा आणि कृणाल पांड्याचं एकमेकांशी पटत नाही. मात्र गुजरात विरुद्धच्या सामन्यात कमाल झाली.
लखनऊ संघ खेळ जिंकत असताना एक छोटी चूक झाल्याने त्यांच्यावर सामना गमावण्वेयाची वेळ त्यांच्यावर आली. हार्दिक पांड्याचा गुजरात संघाने पहिला सामना जिंकला आहे. गुजरात संघाच्या पहिल्या षटकामध्ये शुभमन गिल शून्यवर बाद झाला. “एकमेकांसोबतच्या हसत आणि मस्करी करण्याच्या आपल्या शेवटच्या आठवणी मी कायम जपेन. आम्ही आनंदी होतो,” असे पांड्या म्हणाला. तर यावर “पण मला माहित आहे की, परिस्थिती काही असो मी नेहमी आनंदी राहावं ही तुझी इच्छा आहे.” असे दीपक हुड्डाने माध्यमांशी बोलताना मत व्यक्त केले.
दीपक हुड्डाने त्याला झेलबाद केलं. दीपक हुड्डाने जसं झेलबाद केलं त्याच वेळी कृणाल पांड्याने त्याला घट्ट मिठी मारून विकेट गेल्याचा आनंद सेलिब्रेट केला. हे सेलिब्रेशन खूप खास होतं. त्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
दीपक आणि कृणालमधील वाद नेमका काय?
दीपक हुड्डाने कृणाल पांड्यावर गंभीर आरोप लावला होता. कृणालने त्याला शिवीगाळ केल्याचा आरोप दीपकने केला. यामुळे त्याने २०२१ मध्ये सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हापासून या दोघांमध्ये धुसफूस आहे.
कृणालने दीपक हुड्डाला करिअर संपवण्याची धमकी दिली होती. एवढं सगळं झाल्यानंतर हे दोघंही एकमेकांचं कधीही तोंड पाहू इच्छीत नसताना मात्र आता एकाच संघातून आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहेत.
दीपक हुड्डाने कृणालवर अपशब्द वापरल्याचाही आरोप केला आहे. कृणालमुळे मी निराश, दुःखी आणि दबावाखाली असल्याचं दीपक हुड्डानं म्हटलं होतं.