जुनी पेन्शन संपाचा तिसरा दिवस: आंदोलन सुरूच, शहरातील अन्नधान्य वितरण कार्यालयाला कुलूप, नागरिकांची तारांबळ


अहमदनगर29 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

“एकच मिशन जुनी पेन्शन’;”कोण म्हणतंय देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही’अशा घोषणा देत सरकारी कर्मचाऱ्यांनी गुरुवारी 16 मार्चला सलग तिसऱ्या दिवशीही संप सुरू ठेवला. अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली. दरम्यान, शहरातील अन्नधान्य वितरण कार्यालयाला संपामुळे कुलूप लागले होते. शहरासह उपनगरातून रेशनकार्ड तसेच दुरुस्ती करण्यासाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत.

Advertisement

राज्य सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शन योजनेसाठी मंगळवार 14 मार्च पासून बेमुदत संप सुरू केला आहे. बुधवारी 15 मार्चला देखील हा संप सुरूच होता. गुरुवारी (16 मार्च)ला संपाचा तिसरा दिवस होता.अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय समोर गुरुवारी सरकारी कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शन साठी जोरदार घोषणाबाजी करून निदर्शने केली.

कामकाज ठप्प

Advertisement

कर्मचाऱ्यांच्या संपामुळे अहमदनगर जिल्हा अधिकारी कार्यालयातील सर्व विभागातील कामकाज ठप्प झालेले होते. त्याचबरोबर अन्य प्रशासकीय कार्यालयातील देखील कामकाज ठप्प झाल्याचे दिसून आले.

राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या पेन्शन संदर्भात तातडीने निर्णय घेणे आवश्यक आहे. सरकारने भरती संदर्भात घेतलेल्या निर्णयावर आमचा आक्षेप असून, हा निर्णय मागे न घेतल्यास निर्णयाची संघटनेच्या वतीने होळी करण्याचा इशारा मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब डमाळे यांनी दिला.

Advertisement

या आंदोलनात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर, सरचिटणीस रावसाहेब निमसे,आदींसह महिला कर्मचारी आंदोलनात सहभागी झालेल्या होत्या.

नागरिकांची कामे थांबली

Advertisement

संपाचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या निगडित असलेल्या अन्नधान्य व पुरवठा विभागावर देखील झाला आहे. जिल्हा पुरवठा विभागातील सर्वच कर्मचारी संपावर असल्याने सर्वसामान्य नागरिकांची कामे थांबली आहेत.

साडेतीन लाख लोकसंख्या असलेल्या अहमदनगर शहरासाठी जुने कलेक्टर ऑफिस परिसरात असलेल्या शहर अन्नधान्य वितरण कार्यालयाला गुरुवारी कुलूप होते. त्यामुळे शहरासह केडगाव भिंगार नागापूर सावेडी या उपनगरातून नव्यारेशन कार्डसाठी तसेच रेशन कार्ड दुरुस्तीसाठी आलेल्या नागरिकांना नाहक हेलपाटा बसला. संपामुळे राज्य सरकारी कर्मचारी कामावर उपस्थित नसल्याने विविध सरकारी कार्यालयांमध्ये दिवसभर शुकशुकाट होता.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement