जी 20 च्या तयारीसाठी औरंगाबादेत ए 20 ची तयारी: उद्योग संघटनांसह विविध संस्था करणार प्रशासनाला सहकार्य


औरंगाबाद6 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

जी 20 च्या निमित्ताने शहरात 45 देशांचे प्रतिनिधी येणार आहे. त्यासाठी तयारी करण्यासाठी ए 20 ची स्थापना करण्यात आली आहे. शहरातील उद्योजक, व्यापारी, क्रेडाई, आयएमए अशा 20 संस्था एकत्र येवून टिम असोसिएशन हा फोरम तयार केला आहे. या सगळ्या संस्थेचे स्वयंसेवक एकत्र येवून प्रशासनाला विविध कामात सहकार्य करणार आहे, अशी माहीती उद्योजक मुकुंद कुलकर्णी यांनी दिली.

Advertisement

यात प्रामुख्याने 11 व 12 फेब्रुवारी रोजी महास्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. यात 50 हजारापेक्षा अधिक नागरिकांनी सहभाग घ्यावा. यासाठी टिम ऑफ असोसिएशन प्रयत्न करणार आहे. शहरातील नऊ झोनमध्ये 80 रस्त्यांचे स्वच्छता करण्यात येणार आहे. नागरिकांनी देखील आपण राहतो त्या घराचा परिसर, गल्ली, मोकळ्या जागा स्वच्छ कराव्या असे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमाl शाळा, महाविद्यालय, संस्था, संघटना सहभागी होवू शकतात. या टिमकडे शहरातील तीन चौक सुशोभिकरणाची जवाबदारी देखील देण्यात आली आहे.

या संघटनांचे प्रशासनाला सहकार्य

Advertisement

औरंगाबाद फर्स्ट, सीएमआयए, मसिआ, सीआयआय, एजीव्हीएम, एआयएसए, क्रेडाई, एआयसीए, आयसीएआय, टिपीए, एलयुबी, बीआयएमटिए, आयएमए, एनआयपीएम, एपीपीएफ, एसआयएएम, एटीडिएफ, एएच अ‌ॅन्ड आरए, एटिजीडब्लुयए या संस्था सहभागी झाल्या आहेत. यावेळी व्यापारी महासंघाचे संजय कांकरीया, प्रसाद कोकीळ, प्रशांत देशपांडे, मनपा उपायुक्त सोमनाथ जाधव, शिवशंकर स्वामी यांची उपस्थिती होती.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement