जिल्ह्यातील बहुतांश आराेग्य केद्रांमध्ये मनमानी कारभार: केद्रांना रात्री अपरात्री द्यावी लागणार भेट, पाहणी दाैऱ्यानंतर सीईओंनी दिले आदेश


नाशिकएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

ग्रामीण भागातील नागरिकांना आराेग्याच्या साेयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी दरवर्षी काेट्यवधी रूपयांचा खर्च करण्यात येताे. मात्र जिल्ह्यातील बहुतांश प्राथमिक आराेग्य केंद्रांमध्ये मनमानी कारभार सुरू असल्याचे वास्तव खुद्द सीईओंनी दिलेल्या भेटीत समाेर आले आहे.

Advertisement

यापुढे जिल्ह्यातील सर्वच प्राथमिक आराेग्य केद्रांमध्ये रात्री अपरात्री भेट देऊन पाहणी करण्याचे व त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश सीईओ आशिमा मित्तल यांनी जिल्ह्यापासून तालुकास्तरीय यंत्रणेला दिले आहेत.

मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांनी जिल्ह्याच्या विविध भागांना भेटी देण्यास सुरूवात केली आहे. याच अनुषंगाने त्यांनी मागील आठवड्यात येवला तालुक्यातील राजापूर प्राथमिक आराेग्य केंद्र व कळवण तालुक्यातील नांदुर्डी प्राथमिक आराेग्य केंद्रास भेट देऊन पाहणी केली. या भेटीत त्यांना आराेग्य केंद्रांमध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या. या केंद्रांमध्ये रात्रीच्या वेळी एकही रूग्णाची नाेंद आढळली नाही.

Advertisement

यंत्रणेच्या कामकाजाची पध्दत लक्षात येण्यास सीईओंना वेळ लागला नाही. त्यांनी तात्काळ पंचायत समित्यांच्या विस्तार अधिकाऱ्यांपासून अन्य अधिकाऱ्यांनी रात्रीच्या वेळी प्राथमिक आराेग्य केंद्रांना भेट देणे अनिवार्य केले आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी केव्हा भेट दिली, याबाबतची तारीख व वेळ नमुद करण्यासह त्याबाबतचा अहवाल त्यांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठवावा लागणार आहेे. या कामात कसुर करणाऱ्यांना प्रशासकीय कारवाईचा सामना करावा लागणार आहे. सीईओंच्या या आदेशामुळे जिल्ह्यातील सर्वच प्राथमिक आराेग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचारी अर्लट झाले आहेत.

सीईओंनी केलेल्या पाहणी दाैऱ्यात प्राथमिक आराेग्य केंद्रांमध्ये पाण्याची व्यवस्था नसल्याचे आढळून आले. तर काही ठिकाणी डाॅक्टरांसह कर्मचारी हजर नसल्याचे समाेर आले. त्यामुळे सीईओंनी प्राथमिक आराेग्य केंद्रांना त्वरीत पाण्याची व्यवस्था करून दिली. वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीसाठी रात्रीच्या वेळी अचानक भेट देण्याचे त्यांनी अनिवार्य केले.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement