- Marathi News
- Local
- Maharashtra
- Ahmednagar
- District Primary Teachers’ Association Met The Education Officers, Bhaskar Patil’s Appeal To Give The Benefits Of Selection Category To Eligible Teachers Immediately
अहमदनगर6 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
शिक्षकांच्या माहिती संकलनाचे काम सुरु असून लवकरच पात्र शिक्षकांना निवडश्रेणीचा लाभ मिळवून देवू असे आश्वासन जिल्हा शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी, अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाला दिले.
डॉ. संजय कळमकर यांच्या नेतृत्वाखालील शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर शिक्षणाधिकारी पाटील यांच्याशी चर्चा केली. माध्यमिकचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस, संघाचे राज्यप्रतीनिधी अंबादास गारुडकर, सुनील बनोटे, गुरुकुलचे जिल्हाध्यक्ष सुदर्शन शिंदे, पदवीधर शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रघु झावरे, संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सालके, सय्यद अली, भास्कर नरसाळे, मधु मैड, बाळासाहेब देंडगे,गजानन जाधव आदी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, वरिष्ठ श्रेणीचे काम पूर्णत्वास आले असून येत्या आठ दिवसात सर्व प्रकरणांना मंजुरी मिळेल. आंतरजिल्हा बदलीने नगर जिल्ह्यात आलेल्या सातशे शिक्षकांचे शेड्युल्ड त्यांच्या आधीच्या जिल्ह्यातील लेखाधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्याकडून मागवण्यात आले आहे. थकीत वैद्यकीय बिलांच्या पूर्ततेसाठी अनुदान प्राप्त करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. सध्या सुरू असलेली जिल्हांतर्गत बदलीप्रक्रिया संपल्यानंतर मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखांच्या पदोन्नतीची प्रक्रिया राबवली जाईल. समानीकरणाची टक्केवारी नियमानुसारच ठेवण्यात आली आहे. त्यात बदल करता येणार नाही असेही त्यांनी सांगितले. मराठी भाषा पंधरवडा साजरा करण्यासाठी प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या कथाकथन स्पर्धा घेण्याविषयी शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी सहमती दर्शवली.
थकीत देयकांसाठी अनुदान देण्याची मागणी
नोव्हेबर 2022 पासून थकीत असलेली, वैद्यकीय बिले व इतर थकीत देयकांसाठी अनुदान प्राप्त करून देणे व राज्यातील सर्व जिल्ह्यांचे वेतन नियमित करण्यासंदर्भात शिक्षक संघाचे राज्यनेते संभाजी थोरात, राज्याध्यक्ष अंबादास वाजे, राष्ट्रीय महासचिव बाळासाहेब झावरे, राज्य सरचिटणीस आबासाहेब जगताप यांनी मुंबई येथे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी चर्चा केली, अशी माहिती सरचिटणीस आबासाहेब जगताप यांनी दिली.