जिल्हा परिषदेत लवकरच होणार 1,411 कर्मचाऱ्यांची भरती: प्रशासकीय प्रक्रियांना आला वेग, फेब्रुवारीत निघणार जाहीरात


सोलापूरएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

ग्रामीण विकासाचे प्रमुख केंद्र अशी ओळख असलेल्या जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमधील तब्बल 1,411 कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे. यासाठी प्रशासकीय पातळीवर कामांना गती येत आहे. फेब्रुवारी महिन्यात ‘गट क’ मधील रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहीरात प्रसिध्द होण्याची शक्यता आहे.

Advertisement

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त 75 हजार कर्मचार्‍यांची पद भरती करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयानुसार शासकीय कार्यालयात रिक्त असलेल्या कर्मचार्‍यांची भरती प्रक्रिया करण्यास चांगलाच वेग आला आहे. राज्य शासनाने स्वतंत्र शासन निर्णय प्रसिध्द करुन जिल्हा परिषदेच्या रिक्त जागांपैकी 80 टक्के जागा सरळ सेवेने भरती करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा परिषद प्रशासनाकडून रिक्त जागा सरळ सेवेने भरती करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आला आहे.

येत्या 15 डिसेंबरपर्यंत रिक्त पदांचे बिंदू नामावली (रोस्टर) तपासणी पूर्ण होण्याची शक्यता आहे. राज्य शासनाकडून भरतीचे आदेश येण्यापूर्वीच जिल्हा परिषदेतील कर्मचार्‍यांना पदोन्नती देण्याचेही काम प्रशासनाने हाती घेतले आहे. शिक्षकांना मुख्याध्यापकपदी, कनिष्ठ सहायकांना वरिष्ठ सहायकपदी, ग्रामसेवकांचे ग्रामविकास अधिकारीपदी पदोन्नती प्रक्रिया झेडपी प्रशासनाने पूर्ण केली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांना सरळसेवा भरती सुरू होण्यापुर्वीच न्याय मिळाला आहे. तसेच, अनुकंपा तत्वावरही पात्र असणार्‍या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याने सरळसेवा भरतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

Advertisement

विभागनिहाय असलेली रिक्त पदे

सामान्य प्रशासन

Advertisement

लघुलेखक : 2

– बांधकाम विभाग

Advertisement

कनिष्ठ अभियंता : 33

प्राथमिक शिक्षण विभाग

Advertisement

विस्तार अधिकारी शिक्षण :2

केंद्रप्रमुख : 80

Advertisement

शिक्षक : 624

सामान्य प्रशासन विभाग

Advertisement

लघुटंकलेखक : 2

वरिष्ठ सहायक :9

Advertisement

कनिष्ठ सहायक : 53

अर्थ विभाग

Advertisement

कनिष्ठ लेखाधिकारी :3

वरिष्ठ सहायक : 6

Advertisement

कनिष्ठ सहायक : ९

ग्रामपंचायत विभाग

Advertisement

ग्रामविकास अधिकारी : 19

ग्रामसेवक : 80

Advertisement

बांधकाम विभाग

आरेखक : 1

Advertisement

स्थापत्य अभियांत्रिकी सहायक : 88

कनिष्ठ आरेखक : 2

Advertisement

अनुरेखक :9

कनिष्ठ यांत्रिकी :1

Advertisement

जोडारी : 1

जॅक हॅम ड्रिलर : 2

Advertisement

आरोग्य विभाग

औषध निर्माण अधिकारी : 9

Advertisement

आरोग्य सेवक (पुरुष) 50 टक्के फवारणी : 82

आरोग्य सेवक पुरुष 40 टक्के :9

Advertisement

आरोग्य सेवक पुरुष 10 टक्के : 43

आरोग्य सेविका : 314

Advertisement

पशुसंवर्धन विभाग

पशुधन पर्यवेक्षक : 46

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement