जिल्हयात 14,600 तर राज्यात 8 लाख जणांनी दिली तलाठी परीक्षा: निकाल नोंव्हेंबरमध्ये लागण्याची शक्यता, बंदमुळे हुकला होता काहींचा पेपर

जिल्हयात 14,600 तर राज्यात 8 लाख जणांनी दिली तलाठी परीक्षा: निकाल नोंव्हेंबरमध्ये लागण्याची शक्यता, बंदमुळे हुकला होता काहींचा पेपर


औरंगाबादएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

राज्यभरातील सर्व उमेदवारांचे लक्ष असलेल्या आणि चर्चेचा विषय ठरलेल्या तलाठी भरतीची परीक्षा अखेर १४ सप्टेंबरला संपली. आता उमेदवारांना निकालाचे वेध लागले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्हाचे परीक्षा केंद्र निवडलेल्या १६,३३५ उमेदवारांपैकी १४, ६०० उमेदवारांनी परीक्षा दिली. तर राज्यातून १० लाख ४१ हजार उमेदवारांपैकी ८ लाख ६४ हजार उमेदवारांनी प्रत्यक्षात परीक्षा दिली आहे.

Advertisement

तलाठी भरती परीक्षेसाठी जवळपास १३ लाखहून अधिक अर्ज आले होते. छाननीनंतर राज्यभरातील ४,४६६ जागांसाठी १० लाख ४१ हजार ७१३ अर्ज पात्र ठरले. त्यापैकी प्रत्यक्षात ८ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी परीक्षा दिली. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये १६, ३३५ उमेदवारांपैकी १४, ६०० जणांनी ७ केंद्रांवर परीक्षा दिली. मोठ्या प्रमाणात अर्ज आल्याने ही परीक्षा तीन टप्प्यांत आणि तीन सत्रात घेण्यात आली. ट

पहिला टप्पा १७ ते २२ सप्टेंबर पहिला टप्पा, दुसरा २६ ऑगस्ट ते २ सप्टेंबर, तिसरा टप्पा ४ ते १४ सप्टेंबर असे तीन टप्पयात तीन सत्रात ही परीक्षा झाली. मध्ये एक दिवस बंद आल्याने हजार परीक्षार्थी परीक्षा देवू शकले नाहीत. तर पेपर मध्ये गैर प्रकार झाल्याच्या घटनांमुळेही परीक्षा सुरुवातीपासूनच गाजली. परीक्षेच्या सर्व सत्रांची माहिती टीसीएस कंपनीच्या सर्व्हरवर एकत्रित केली जाणार आहे.

Advertisement

त्यानंतर कंपनीकडून उत्तरपत्रिका जाहिर करण्यात येतील. यानंतर परीक्षा दिलेल्या उमेदवारांच्या लॉगइनमध्ये प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका दिसण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच इतर परीक्षांमध्ये देण्यात येणाऱ्या आक्षेप नोंदणीची सुविधा या परीक्षेसाठीही दिली जाणार आहे. या परीक्षेचा निकाल नोव्हेंबरमहिन्यात लागण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान परीक्षेत झालेले गैरप्रकारांमुळे त्याचा परिणाम निकालावार होवू नये. निकाल जाहिर होवून पारदर्शकपणे भरतीची प्रक्रकिया राबविण्यात यावी असे परीक्षार्थींनी म्हटले आहे. तर आक्षेप नोंदणी नंतरच निकाल सर्व काळजी घेऊन जाहीर करावा असेही परीक्षार्थींना म्हटले आहे.

Advertisement



Source link

Advertisement