जाणून घेणे आवश्यक: 17 वर्षांचे तरुण करू शकतात मतदार ओळखपत्राची नोंदणी, वर्षांतून चारदा संधी मिळेल


औरंगाबाद26 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

व्होटर आयडीसाठी तरुणांना १८ वर्षे वय होण्याची वाट पाहावी लागणार नाही. १७ व्या वर्षातही मतदार ओळखपत्रासाठी नाव नोंदवण्यासाठी अर्ज करू शकता. यासाठी ऑनलाइन नोंदणी अनिवार्य असेल. हे कसे ते पाहू…

Advertisement

{ १७ व्या वर्षी नोंदणी कशी करावी? निवडणूक आयोगानुसार, भारतीय नागरिक आता १७ व्या वर्षी मतदार यादीत नाव नोंदवू शकतात. यासाठी ते एनव्हीएसपी डॉट इनवर(नॅशनल व्होटर्स सर्व्हिस पोर्टल) जाऊन आपली नोंदणी करू शकतात. यासाठी सर्वप्रथम त्यांना पोर्टलवर जाऊन लॉगइन आयडी आणि पासवर्ड तयार करावा लागेल. यानंतर नोंदणीसाठी फॉर्म क्र.६ भरावा लागेल. {नोंदणीनंतर नाव कसे समाविष्ट होईल? तुमची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर हा फॉर्म संबंधित भागातील निवडणूक अधिकाऱ्याकडे ऑनलाइन जाईल. बीएलओद्वारे १८ वर्षे वय पूर्ण झाल्यावर मतदार यादीत नाव जोडले जाईल. याशिवायच मतदान केंद्र अधिकारी(बीएलओ) घरोघरी जाऊन मोहीम चालवतील. नव्या प्रारूपाचा फॉर्म सहा-बीमध्ये आधार कार्डचा क्रमांक द्यावा लागेल. यामुळे तुमचे मतदार ओळपत्र आधारशी लिंक केले जाऊ शकेल. {वर्षात किती वेळा संधी मिळेल? आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी आता १ जानेवारीची वाट पाहण्याची गरज नाही. आता युवा १ एप्रिल, १ जुले आणि १ ऑक्टोबरला व्होटर आयडीसाठी अर्ज करू शकतात. एकदा मतदारांचे नाव आधार क्रमांकाशी जोडले गेल्यास मतदार यादीत या नावाची नक्कल राहणार नाही. {मोहीम कधीपासून चालवली जाणार? १ ऑगस्ट ते ३१ डिसेंबरपर्यंत मोहीम चालवून मतदार यादीत समाविष्ट प्रत्येक नावाचा आधार क्रमांक एकत्रित केला जाईल. हे आधारशी लिंक केले जाणार आहे.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement