जळगाव2 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
सुडाचे राजकारण करायचे,त्यांच्याविरुध्द बोलणाऱ्यांना इडी,सीबीआय मागे लावायची.अशा स्वरुपाच्या चौकशी करुन दडपण आणायचे.माझ्यामागे तर सर्व यंत्रणा लावल्या आहेत.माझ्यावर मकोका का लावला,अरे बाबा तू माझ्यामागे इडी लावली म्हणून तुमच्यावर मकोका लावला.इडी नसती तर मकोका कशाला लावला असता.सत्तेचा माज फारकाळ टीकत नाही.महाभारत,रामायणापासून हा इतिहास माहिती असल्याची टीका एकनाथ खडसे यांनी केली आहे.
खडसे जामनेर मतदार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरील लाक्षणीत उपोषण प्रसंगी बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे युवक कांॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख,जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी,प्रदीप लोढा, संजय गरुड,विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. खडसे म्हणाले, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबीत आहेत. महागाई मोठ्या प्रमाणावर वाढत चालली आहे.
पालकमंत्री गुलाबराव पाटील मुख्यमंत्र्यांच्या जवळचे तर गिरीश महाजन उपमुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत. त्यांची पत असेल तर त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करावी. महागाईच्या प्रश्नावर बोलायला मंत्री तयार नाहीत.
तुमच्या मंत्र्यांना अन्य बाबींमध्ये रस..
तुमच्या मंत्र्यांना महागाई कमी करण्यात रस नाही. अन्य बाबींमध्ये रस आहे. तुम्हाला माहिती आहे. त्यांना अन्य कोणत्या बाबींमध्ये रस आहे. जामनेरच नव्हे संपूर्ण महाराष्ट्राला ते ज्ञात आहे. शासकीय उद्योगांमध्ये अनेकांना न्याय देतात. तिकडे न्याय देता तेवढा शेतकऱ्यांनाही दिला पाहिजेत.मी काय चोऱ्या केल्या का फर्दापूरच्या रेस्ट हाऊसमध्ये गेलो असे म्हणून फर्दापूर येथील प्रकरणात गिरीश महाजन यांना वाचवलं नसतं तर आज वडीलांच्या पेन्शनवर जगायची वेळ त्यांच्यावर आली असती.प्रामाणिक शिक्षकाचा मुलगा म्हणून त्यांना वाचवलं.ही मोठी चूक झाल्याची टीका खडसे यांनी मंत्री महाजनांवर केली.
खडसेंना मिळाली न्यायालयाची नोटीस
चौकशीनंतर माझी संपत्ती अॅटॅच करुन ठेवण्यात आलेली आहे. काल न्यायालयात नोटीस मिळाली. खडसेंची आता संपत्ती जप्त करायची आहे. न्यायालयाने ३० मे ही तारीख दिली असल्याचेही त्यांनी सांगितले. अलिकडच्या कालखंडात सर्वाधिक आत्महत्या या जळगाव जिल्ह्यात झाल्या आहेत.
शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. कापसाला सात हजार रुपयांच्या आत भाव आहे. जुना कापूस घरात असताना नवीन कापूस येत आहे अशी शेतकऱ्यांची परिस्थिती आहे. जुना कापूस विकता आला नाही. मागच्या वर्षी महाविकास आघाडी सरकारच्या काळात ज्वारी २७५० रुपये प्रती क्विंटलने खरेदी करण्यात आली होती. आता ज्वारी, मकाला भाव नाही. शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम सरकार करीत असल्याचाही त्यांनी आरोप केला.