अकोला2 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
पश्चिम विदर्भातील ९ मोठ्या प्रकल्पात साठवण क्षमतेच्या ३९.७२ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. सर्वाधिक जलसाठा अमरावती जिल्ह्यातील ऊर्ध्व वर्धा प्रकल्पात, तर सर्वात कमी जलसाठा बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा प्रकल्पात आहे.
अमरावती जिल्ह्यात ऊर्ध्व वर्धा, यवतमाळ जिल्ह्यात पूस, अरुणावती, बेंबळा, अकोला जिल्ह्यात काटेपूर्णा, वान. बुलडाणा जिल्ह्यात नळगंगा, पेनटाकळी आणि खडकपूर्णा असे एकूण नऊ मोठे प्रकल्प आहेत. या प्रकल्पामुळे १३९९.९१ दलघमी साठवण क्षमता निर्माण झाली आहे. तर वाशीम जिल्ह्यात एकही मोठा प्रकल्प नाही.
कोणत्या जिल्ह्यात किती जलसाठा?
मागील वर्षी जोरदार पाऊस झाल्याने सर्वच मोठ्या प्रकल्पाचे अनेकदा दरवाजे उघडावे लागले होते. त्यामुळे मे अखेरीसही मोठ्या प्रकल्पात बऱ्यापैकी जलसाठा उपलब्ध आहे. तसेच अमरावती जिल्ह्यात सात मध्यम, यवतमाळ जिल्ह्यात सहा, अकोला जिल्ह्यात चार, वाशीम जिल्ह्यात तीन, तर बुलडाणा जिल्ह्यात सात मध्यम प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमुळे ७६५.०३ दलघमी साठवण क्षमता निर्माण झाली आहे. तूर्तास मध्यम प्रकल्पात ३४०.२० दलघमी जलसाठा उपलब्ध आहे.
मोठ्या प्रकल्पातील जलसाठा दलघमीत ऊर्ध्व वर्धा- २५९.६१, पूस प्रकल्प- ४४.७१ , अरुणावती- ५७.८० , बेंबळा प्रकल्प- ७२.१९ , काटेपूर्णा- २७.३४, वान- ३४.०३ , नळगंगा- २०.४४ , पेनटाकळी- २८.३९ , खडकपूर्णा- १०.९४