- Marathi News
- Local
- Maharashtra
- Ahmednagar
- Polluted Water Bleaching Powder Is Inferior Chlorine Content I Ahmednagar News
अहमदनगरएका तासापूर्वी
- कॉपी लिंक
जिल्ह्यातील नागरिकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या पुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायतींमार्फत जलस्त्रोतांचा ब्लिचिंग पावडरचा वापर केला जातो. या पावडरचे नमुने जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत तपासल्यानंतर १२ गावातील पावडरमध्ये क्लोरिनचे प्रमाण कमी असल्याचे आढळून आले आहे. यापार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने संबंधित ग्रामपंचायतींना सूचना दिल्या आहेत.
जिल्ह्यात दरमहा जलस्त्रोतांच्या पाणी नमुण्यांची तपासणी केली जाते. त्याचबरोबर शुद्धीकरणासाठी वापरल्या जाणाऱ्या ब्लिचिंग पावडरची गुणवत्ताही तपासली जाते. जिल्ह्यात नेमलेल्या जलसुरक्षकांमार्फत ब्लिचिंग पावडरचा वापर करून पाणी निर्जंतूक केले जाते. नद्या, तलावांचे पाणी भरून आणण्याची पद्ध असेल तर रासायनिक पद्धत म्हणून ब्लिचिंग पावडरचा वापर केला जातो. परंतु, पावडरीत ब्लिचिंगचे प्रमाण २० टक्क्यांपेक्षा जास्त असावे.
क्लोरिनचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी ही पावडर बंद पिशवीत असायला हवी. जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत महिनाभरात ३६० ब्लिचिंग पावडर नमुण्यांची तपासणी करण्यात आली. त्यात सर्वाधिक ५१ नमुने संगमनेर तालुक्यातील होते. परंतु, क्लोरिनचे प्रमाण श्रीरामपूर तालुक्यातील गावांत २० पेक्षा कमी आढळून आले आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
२० पेक्षा कमी क्लोरिनची गावे
जेऊर, दरेवाडी, (नगर), बाबुर्डी, जातेगाव, घानेगाव (पारनेर), वडुले खुर्द (शेवगाव), माळवडगाव, निपाणी वडगाव, अशोकनगर, उंदीरगाव, महाकाळ वडगाव (श्रीरामपूर ) या ठिकाणी ब्लिचिंग पावडरमध्ये क्लोरिनचे प्रमाण २० टक्क्यापेक्षा कमी आढळून आले.
दुषित पाण्यामुळे आरोग्याला धोका
जिल्ह्यातील नागरिकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या पुरवठा करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतची आहे. परंतु, ग्राम हद्दीत जलस्त्रोतांचे नमुने घेतले. यात पावडरचे नमुने आरोग्य प्रयोगशाळेत तपासणीअंती १२ गावातील पावडरमध्ये क्लोरिनचे प्रमाण कमी असल्याचे आढळून आले. त्यामुळे नागरिकांना पिण्यायोग्य पाण्याची गरज आहे. दुषित पाण्यामुळे साथीचे आजारातही वाढ होत आहे.