जयंत पाटलांना सणासुदीला कस बोलाव समजत नाही!: त्यांना फक्त राजकारण करायचं असतं; फोडाफोडीच्या टीकेवरुन फडणवीसांचा टोला

जयंत पाटलांना सणासुदीला कस बोलाव समजत नाही!: त्यांना फक्त राजकारण करायचं असतं; फोडाफोडीच्या टीकेवरुन फडणवीसांचा टोला


  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Jayant Patal Does Not Know How To Celebrate The Festival! Devendra Fadnavis Reply Or Attack On Jayant Patil Over Maharashtra Politics  

मुंबई14 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या घरी गणरायाची प्रतिष्ठापणा करण्यात आली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना फोडाफोडीपेक्षा प्रगतीच्या राजकारणाकडे पाहण्याची सुबुद्धी गणरायाने राज्यकर्त्यांना द्यावी, यावर्षी त्याची फारच गरज आहे, असा टोला जयंत पाटलांनी शिंदे-फडणवीस यांना लगावला. या टीकेला आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Advertisement

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘जयंत पाटलांना सणवार काहीच माहिती नसतं. त्यांना फक्त राजकारण करायचं असतं. सणासुदीला कसं बोललं पाहिजे, हे त्यांना समजत नाही. काय करायचं आपण? सोडून द्या. पुढं असं बोलणार नाहीत, याची गणराय जयंत पाटलांना सुबुद्धी देईल. अशी खोचक टीका जयंत पाटलांवर फडणवीस यांनी केली.

पडळकरांचे विधान अयोग्य
अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहेत, अशी टीका भाजप भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं होतं. यावरही देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. गोपीचंद पडळकर यांचे विधान अयोग्य आहे. अशाप्रकारची विधानं करणं चुकीची आहेत. तिन्ही पक्षातील कार्यकर्त्यांनी आणि आमदारांनी नेत्यांचा सन्मान ठेवला पाहिजे. याप्रकारच्या भाषेचा वापर करू नये, असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

Advertisement

हे ही वाचा

गोपीचंद पडळकर यांचे वक्तव्य अयोग्य:तिन्ही पक्षातील नेत्यांचा सन्मान ठेवला पाहिजे; अशी भाषा वापरु नये – देवेंद्र फडणवीस

Advertisement

आमदार गोपीचंद पडळकर यांचे वक्तव्य अयोग्य आहे. अशा प्रकारचे वक्तव्य करणे चुकीचे आहे. तिन्ही पक्षातील नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि आमदारांनी तिन्ही पक्षातील नेत्यांचा सन्मान ठेवला पाहिजे आणि अशा प्रकारच्या भाषेचा उपयोग करू नये, असे माझे स्पष्ट मत आहे, असे मत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. – येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Advertisement