जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गाडीला आग,पाच जवानांचा मृत्यू, वीज कोसळल्यानं अनर्थ घडला?


जम्मू काश्मीर :जम्मू काश्मीरच्या पुंछमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. सैन्यदलाच्या गाडीला लागलेल्या आगीत पाच जवानांचा मृत्यू झाला. अद्याप सैन्यदलाच्या गाडीला आग नेमक्या कोणत्या कारणानं लागली यासंदर्भातील कारण समोर आलेलं नाही. मात्र, प्राथमिक अंदाजानुसार ही आग सैन्यदलाच्या ट्रकवर वीज कोसळल्यानं लागल्याचं बोललं जात आहे.

Advertisement

नेमकं काय घडलं?

भारतीय सैन्यदलाच्या ट्रकला दुपारी जम्मू काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात आग लागली. संरक्षण दलातील सूत्रांच्या माहितीनुसार ट्रकवर वीज कोसळल्यानं आग लागली आहे. पुंछ जिल्ह्यातील भटा धुलियानं भागात जोरदार पाऊस सुरु असताना हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे. मेंधर उपविभागातील डोंगरी भागात घटना घडली त्यावेळी मुसळधार पाऊस सुरु होता.
१३ सेक्टरच्या राष्ट्रीय रायफल्सचे कमांडर तातडीनं घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत. पुंछ जिल्हा मुख्यालयापासून हे अंतर ९० किलोमीटर अंतरावर आहे.

वीज कोसळल्यानं ट्रकला आग?

भारतीय सैन्य दलाच्या ट्रकवर वीज कोसळून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. जम्मू काश्मीर पोलीस आणि सैन्यदलाचं पथक घटनास्थळाकडे रवाना झालं आहे.

Advertisement

वाढदिवसाचे निमित्त की खासदारकीची लॉबिंग? पुण्यात बॅनरबाजी सुरुच,आता प्रशांत जगतापांचा भावी खासदार असा उल्लेख

कधी घडली घटना?

सैन्यदलाचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल देवेंदर आनंद यांच्या माहितीनुसार आज दुपारी ३.१५ वाजताच्या दरम्यानं ही घटना घडली. वीज कोसळल्यानं ही घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. सैन्यदलाची वाहनं भीमबर गली ते सनगैओटमध्ये निघाली होती.

Advertisement

सैन्य दलाच्या प्रवक्त्याच्या माहितीनुसार ५ जवानांचा मृत्यू झाला आहे. सैन्यदलातील नेमक्या कोणत्या जवानांचा मृत्यू या दुर्घटनेत झाला यंसंदर्भातील माहिती अद्याप समोर आलेली नाही. सैन्यदलाकडून यासंदर्भात लवकरच माहिती दिली जाण्याची शक्यता आहे.
दादा, आम्ही सदैव तुमच्यासोबत! पिंपरीत NCP च्या माजी नगरसेवकाने भरचौकात फ्लेक्स लावला

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी भटिंडा मिलिटरी स्टेशनवर एका जवानानं त्याच्या पाच सहकाऱ्यांवर गोळीबार केला होता. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. गोळीबार करणाऱ्या जवानानं केलेल्या कृत्याचा स्वीकार देखील केला होता. त्या जवानानं बंदूक चोरुन लपवून ठेवली होती. १२ एप्रिलच्या पहाटे साडे पाच च्या दरम्यानं त्यानं सहकाऱ्यांवर गोळीबार केला होता.

Advertisement

महाराष्ट्राचा अथर्व तायडे पहिल्या चेंडूवर चौकार मारूनही दुर्देवी ठरला, पंचांनी नाबाद दिले अन्…Source link

Advertisement