जमावाने फोडल्या ट्रकच्या काचा: ट्रकचा टायर फुटला! पण आत असलेले 60 गोवंश सुखरूप! वाहनात कोंबून केली जात होती वाहतूक


अकोला7 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

मूर्तिजापूर​​​ येथील दर्यापूर रोडवरील उड्डाणपुलावर दर्यापूर व मूर्तिजापूर शहर पोलीसांनी येथील उड्डाण पुलावर शुक्रवारी दुपारी पकडला. या ट्रकमधून गोवंश ६० हून अधिक गोवंश निर्दयपणे कोंबून त्यांची वाहतूक करीत होता.

Advertisement

आयशर ट्रक क्रमांक (सीजी ०४, एनझेड ६९३८) हा छत्तीसगड येथून गोवंश घेऊन अवैद्यरित्या छत्तीसगडची सीमा पार करून महाराष्ट्रामध्ये दाखल झाला असल्याचे माहिती अमरावतीचे भाजप जिल्हा उपाध्यक्ष ग्रामीण ठाकूर प्रमोद सिंह गडरेल यांना मिळाली. यावरून त्यांनी चांदूर बाजारपासून ट्रकचा पाठलाग करत येत असताना दर्यापूर पोलिसांना माहिती दिली. दर्यापूर पोलीस स्टेशनचे निरीक्षक टाले यांनी यांच्या ताफ्यासह ट्रकचा पाठला केला व जवळ अकोला जिल्ह्याची सीमा येत असल्याने मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक सचिन यादव यांना माहिती दिली. यावरून दर्यापूर पोलिस व मूर्तिजापूर शहर पोलिसांनी भाजप व बजरंग दल तसेच विश्व हिंदू परिषदच्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने दर्यापूर रोडवरील उड्डाणपूलवर ट्रक पकडला.

या ट्रकमध्ये ६० हुन अधिक गोवंश छत्तीसगडवरून कत्तली करता कोंबून नेत असल्याचे आढळले. यावेळी गोवंश रक्षकांनी संतप्त जनावरांना पाणी व चारा देण्याची मागणी केली. उपस्थित जमावाने ट्रकच्या काचा फोडल्या.

Advertisement

टायर फुटला ट्रक सापडला

ट्रक गुरे घेऊन ट्रक जात असल्याची माहिती दर्यापूर पोलीसांना मिळताच दर्यापूर पोलीसांनी शोध सुरू केला. परंतु, ट्रक अत्यंत भरधाव असल्या मूर्तिजापूर पोलीस स्टेशन हद्द येऊनही ट्रक सापडत नव्हता, दरम्यान ट्रकचा मूर्तिजापूरजवळ काही किलोमीटर अंतरावर टायर फुटला तरीही चालक ट्रक सुसाट चालवत होता. मूर्तिजापूर येथील आठवडी बाजार असल्याने उड्डाण पुलावर वाहनांची व नागरीकांची गर्दी असल्याने चालकाला ट्रक पुढे काढता आला नाही. तद्वतच घटनास्थळी पोलीसही दाखल झाले. याप्रकरणी दर्यापूर पोलीसांनी कारवाई केल्याची माहिती आहे.

Advertisement



Source link

Advertisement