जनसंवाद यात्रेतून जनतेत दिसली मोदींच्या कारभाराबाबत चीड: कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष प्रदीप पवारांचे प्रतिपादन; समारापोला बाळासाहेब थोरात येणार

जनसंवाद यात्रेतून जनतेत दिसली मोदींच्या कारभाराबाबत चीड: कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष प्रदीप पवारांचे प्रतिपादन; समारापोला बाळासाहेब थोरात येणार


जळगाव11 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

मोदी सरकारच्या कारभाराचा पंचनामा जनतेपुढे मांडण्यासाठी जिल्हा कॉंग्रेस कमिटीने 3 सप्टेंबरपासून जिल्ह्यात जनसंवाद यात्रा काढलेली आहे. या यात्रेत मोदी सरकारविषयी शेतकरी, महिला व युवकांच्या मनात प्रचंड चीड दिसली. तशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद जनतेतून मिळत असल्याने 2024 मध्ये भाजप सत्तेवर येवू शकत नसल्याचे परिस्थिती त्यातून दिसत असल्याचे कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी सांगितले.

Advertisement

राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त कांॅग्रेसतर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली. महानगराध्यक्ष श्याम तायडे,जिल्हा परिषदेचे माजी गटनेते प्रभाकर पवार,सरचिटणीस ज्ञानेश्वर सपकाळे,आत्माराम जाधव उपस्थित होते. या यात्रेत आम्ही जनतेला मोदी सरकारच्या काळात वाढलेली महागाई,शेतकऱ्यांचा शेतमालाला मिळत नसलेला हमीभाव असे विविध मुद्दे सांगण्यासाठी जात आहोत. मात्र, जनतेत आमच्यापेक्षा जास्त जागरुकता दिसली.

आम्हाला माहिती नसलेल्या अनेक बाबी त्यांनी सांगितल्या. शेतकरी म्हणाले, आम्हाला कर्जमाफी किंवा सरकारकडे हात पसरण्याची गरजच नाही. आमच्या शेतमालाला हमीभाव मिळायला हवा. मात्र, भावाअभावी कापूस घरात पडून असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यांनी गावातच पत राहिली नाही. किराणा दुकानदार,कृषी केंद्रचालकांची उधारी थकीत आहे. उच्च शिक्षित तरुण बेरोजगार असल्याने शेतमजुरीचे काम करत असल्याचे सांगितले. गावागावात केंद्रातील मोदी व राज्यातील तीन पक्षांच्या सरकारविरुध्द रोष आहे. भाजपला मतदान करुन दोन वेळेस चूक झाली. तिसऱ्यांदा चूक करणार नाही. तसे केले तर भावी पिढ्या आम्हाला माफ करणार नाहीत, असे लोक म्हणत असल्याचे पवार यांनी सांगितले. जनसंवाद यात्रेचा समारोप १२ सप्टेंबर रोजी सावदा येथे होणार आहे. त्याला माजी मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार आहेत.

Advertisement

नरेंद्र मोदी सत्तेतून जाईपर्यंत अनवाणीच चालणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधानपदावरुन जात नाहीत. खासदार राहुल गांधी देशाचे पंतप्रधान होत नाहीत तोपर्यंत अनवाणी पायाने राहण्याचे शपथ जामनेर तालुक्यातील मालखेडा येथील विकास आत्माराम राठोड यांनी घेतली आहे. सन २०१४ मध्ये मोदींवर विश्वास ठेवून मतदान केले. सन २०१९ मध्येही तीच चूक झाल्याने राठोड यांनी सांगितले.

AdvertisementSource link

Advertisement