जनजागृती: सायकल चालवा, लठ्ठपणा घालवा‎


अकोला‎19 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

बदलत्या जीवनशैलीमुळे‎ दिवसेंदिवस लठ्ठपणाची समस्या‎ उद्भवत आहे. लहान मुलांसह‎ मोठ्यांमध्ये आढळणारा हा लठ्ठपणा‎ घालवण्यासाठी सायकल‎ चालवण्याचा संदेश आरोग्य‎ विभागातर्फे देण्यात आला.‎ जागतिक लठ्ठपणा दिनानिमित्त‎ आरोग्य विभागामार्फत रविवारी‎ शहरातून सायकल फेरी काढून‎ जनजागृती करण्यात आली.‎ अतिपोषण अर्थात लठ्ठपणाच्या‎ समस्येवर नियंत्रणासाठी जनजागृती‎ व्हावी यासाठी ५ मार्चला जागतिक‎ लठ्ठपणा दिवस साजरा केला जातो.‎ या अनुषंगाने आरोग्य विभागातर्फे‎ रविवारी जनजागृती सायकल रॅली‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ काढण्यात आली.

Advertisement

शासकीय‎ वैद्यकीय महाविद्यालयातून सकाळी‎ या रॅलीला सुरुवात झाली.‎ जिल्हाधिकारी कार्यालय चौक मार्गे‎ गांधी चौक, मध्यवर्ती बसस्थानक‎ येथे फेरी पोहोचली. टॉवर चौकात‎ समारोप झाला. रॅलीमध्ये आरोग्य‎ उपसंचालक तथा जिल्हा‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे,‎ जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश‎ आसोले, जिल्हा माता व बाल‎ संगोपन अधिकारी डॉ. विनोद‎ करंजीकर, आरएमओ डॉ. भावना‎ हाडोळे यांच्यासह विविध विभागाचे‎ अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले‎ होते.‎

Advertisement
बातम्या आणखी आहेत…



Source link

Advertisement